सिलिगुडी – पश्चिम बंगालमधील सिलिगुडी ( Siliguri) येथे एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना अचानक चक्कर आल्याने सर्वंजण टेन्शमध्ये आले. कार्यक्रमात भाषण सुरू असताना नितीन गडकरी यांना अचानक भोवळी आली. त्यानंतर गडकरी यांना तातडीने व्यासपीठावरून खाली नेण्यात आले. आणि उपचारासाठी जळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सांगितले की, शरीरातील साखरेची पातळी (Sugar Level) कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
[read_also content=”…तर आदित्य ठाकरेंना आंघोळ घालणार का? दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/so-will-aditya-thackeray-be-bathed-deepak-kesarkar-question-to-the-thackeray-group-345691.html”]
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात सक्षम मंत्री अशी नितीन गडकरी यांची ओळख आहे. आपल्या बिनधास्त, रोखठोक व स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रसिद्ध आहेत. गडकरी यांना चक्कर किंवा भोवळ येण्याची ही पहिलीच वेळ नाहीय, याआधी देखील नितीन गडकरींची साखरेची पातळी घसरल्याने त्यांना एका कार्यक्रमात चक्कर आली होती. कार्यक्रमाआधी त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. पण त्यांना तिकडे लक्ष न देता कार्यक्रमात सहभागी झाले. आणि थोड्याच वेळात त्यांना चक्कर आल्यानं कार्यक्रम सोडून जावा लागला. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.