नवी दिल्ली : वंदे भारत एक्सप्रेस देशाच्या अशा निवडक ट्रेनपैकी एक आहे. ज्यामधून प्रवास करण्याची अनेकांना इच्छा असते. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस स्लीपर व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत रेल्वे प्रशासन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्स्प्रेसच्या तुलनेत अधिक वेगाने चालेल. वंदे भारत स्लीपर कोचचा पहिला प्रोटोटाईप मार्चपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचे परीक्षण एप्रिलमध्ये केले जाईल आणि ट्रेन 2025 च्या अखेरपर्यंत चालू केली जाईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) येथे तयार केल्या जात असलेल्या ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होईल.
कोचमध्ये काय-काय असणार?
‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेनमध्ये आधुनिक इंटिरियर डिझाईन असतील. या ट्रेनमध्ये 16 कोच असतील. 3 टियर, 2 टियर आणि 1AC च्या कोचचा समावेश असेल. आयसीएफ आणि बंगळुरु येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड फॅक्ट्री नवीन स्लीपर कोचची निर्मिती करत आहे. बर्थ, एयर डक्ट, केबल डक्ट, वॉशरुमच्या डिझाइनवर काम केले जाते. सध्या बीईएमएल आयसीएफसाठी एसी दहा ट्रेनचे निर्माण करत आहे.






