सध्य़ा सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. या ट्रेनच्य़ा रहस्याबाबत तामिळानाडूतील एक ठिकाण खूप चर्चेत आलं. ते म्हणजे ताम्बरम् रेल्वेस्टेशन. आता इथे येणाऱ्या ट्रेनची अचानक लाईटस् जाते हे कळल्यावर अनेकांना आहटमधल्या खजानमेलची नक्कीच आठवण येईल. खरंतर अनेकजण .याला भुताटकीचा प्रकार देखील म्हणतात. अचानक सगळं काही ठिकठाक असतानाच लाईटस् जाते त्यामुळे याचा नेमका अंदाज लावता येतच नाही. काहीच्या मते असं देखील बोललं जातं की, इथे अतृप्त आत्म्यांचं सावट आहे त्यामुळे या स्टेशवर गाडी आली की प्रवासी जीव मुठीत घेऊन वावरतात. पण यामागे खरी गोष्ट काही वेगळीच आहे. जी कळल्यावर तुमचं डोकं चक्रावून जाईल.
यामागे भुताटकीचा प्रकार आहे का तर नाही. जाणकारांच्या म्हणण्यानुसार असं सांगितलं जातं की, या सगळ्यामागे तांत्रिक कारणं आहेत. या ताम्बरम् स्टेशनजवळ एक न्युट्रल सेक्शन आहे. आता नेमकं काय तर, दोन वेगवेगळ्या विजपुरवठ्याच्या झोनच्यामध्ये हे स्टेशन येतं. या ठिकाणी ओव्हरहेड वायर्समध्ये देखील करंट नसतो. त्यामुळे जेव्हा ट्रेन एका पावर झोनमधून दुसऱ्या पावरझोनमध्ये जाते तेव्हा ट्रेनमधील वीजपुरवठा काही काळासाठी का होईना खंडित होतो. हा वेळ साधारणत: 7 सेकंदाचा असतो. मात्र यात घाबरण्यासारखं काही नाही असं इंजिनीअर्स सांगतात. या भागात वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे लाईट्स जाते. मात्र हा सगळा परिसर सुरक्षित असून भुताटकीचा असा कोणताही प्रकार या ठिकाणी होत नाही असं सांगण्यात येतं. सुरुवातीच्या काही काळात जेव्हा हा प्रकार घडत होता तेव्हा असं म्हटलं जातं की, प्रवासी घाबरायचे आणि म्हणूनच रेल्वेने हे स्पष्टीकरण दिलं.
दाक्षिणात्य भागातील ताम्बरम हे अत्यंत महत्वाचं ठिकाण मानलं जातं. कारण या ठिकाणाहून देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वेचा रस्ता आहे. त्यामुळे जरी हे गाव छोटं असलं तरी वाहतूकीच्या दृष्टीकोनातून याचं महत्व मोठं आहे.






