Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vande Mataram 150 years: ‘वंदे मातरम’ माझ्यासाठी खूप प्रेरणादायक; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

जगाच्या इतिहासात वंदे मातरमसारखे भावनिक गीत क्वचितच आहे. महात्मा गांधींच्या संदर्भाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, गांधींच्या भावनांनाही वादात ओढण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 08, 2025 | 02:29 PM
Vande Mataram 150 years,

Vande Mataram 150 years,

Follow Us
Close
Follow Us:
  • वंदे मातरम हे गाणे माझ्यासाठी खूप प्रेरणादायक
  • बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी , ७ नोव्हेंबर १८७५ रोजी वंदे मातरम लिहिले होते
  • वंदे मातरम येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे
‘वंदे मातरम’ हे ब्रिटिशांना योग्य उत्तर होते आणि आजही हे घोषवाक्य आपल्याला प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनाही ते खूप आवडायचे.” अशा शब्दांत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मारतरच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाषण केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हे गाणे माझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे.
१५ ऑक्टोबर १९३६ रोजी मोहम्मद अली जिना यांनी लखनऊमधून वंदे मातरमच्या विरोधात घोषणा दिली. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे सिंहासन हललेले पाहिले. मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना योग्य उत्तर देण्याऐवजी आणि त्यांचा निषेध करण्याऐवजी उलट घडले. त्यांनी वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ” १८७५ मध्ये बंकिमचंद्रांनी लिहिलेले, आनंदमठ मध्ये प्रकाशित झाले. भारताचे राष्ट्रगीत, वंदे मातरम, ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले होते. ते पहिल्यांदा १८८२ मध्ये त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचा भाग म्हणून त्यांच्या ‘बंगदर्शन’ मासिकात प्रकाशित करण्यात आले होते. १८९६ मध्ये, रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात व्यासपीठावर ‘वंदे मातरम’ गायले. हे गाणे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिकरित्या गाण्यात आले.

Winter Session 2025 : वंदे मातरम् वरुन संसदेमध्ये होणार तब्बल 10 तास चर्चा; PM मोदी स्वतः करणार विषया

वंदे मातरम येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे – पंतप्रधान मोदी

नरेंद्र मोदी म्हणाले, “जर आपण सर्वांनी याचा सुज्ञपणे वापर केला तर वंदे मातरम येणाऱ्या पिढ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरू शकते. वंदे मातरमने स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा दिली आणि देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या लढ्याला दिशा दिली. जेव्हा वंदे मातरमला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश गुलामगिरीत होता. १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश आणीबाणीच्या बेड्यांमध्ये होता आणि संविधानाचा गळा दाबला गेला. देशभक्तांना तुरुंगात टाकण्यात आले. लोकसभेत वंदे मातरमवरील आजची चर्चा राष्ट्राला एकत्र करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देईल.

“वंदे मातरम – लढाई स्वीकारण्याचा पवित्र सण”

मोदी म्हणाले की, “आपल्या सर्व खासदारांसाठी वंदे मातरम हा लढाई स्वीकारण्याचा पवित्र सण आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम – संपूर्ण देश वंदे मातरमच्या जयघोषाने एकत्र आला. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देशाला सोबत घेऊन पुढे जायचे आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकार करण्यासाठी वंदे मातरम प्रेरणा ठरू दे.”

Panjab Politics: ५०० कोटींची ‘सुटकेस’ दिली तरच मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवर कोणी केले गंभीर आरोप

“वंदे मातरमचा विश्वासघात का?”

जगाच्या इतिहासात वंदे मातरमसारखे भावनिक गीत क्वचितच आहे. महात्मा गांधींच्या संदर्भाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, गांधींच्या भावनांनाही वादात ओढण्यात आले. मोदींनी इतिहासातील घटनांचा दाखला देत आरोप केला की, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी वंदे मातरमच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतली नाही. “नेहरूंनी ना स्वतःची निष्ठा व्यक्त केली, ना मुस्लिम लीगचा तीव्र निषेध केला; उलट वंदे मातरमची चौकशी सुरू केली,” असा आरोपही त्यांनी केला.

नेहरूंचे २० ऑक्टोबर १९३७ चे पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १५ ऑक्टोबर १९३७ रोजी लखनौ येथे मोहम्मद अली जिना यांनी ‘वंदे मातरम’ घोषणेला विरोध केला, त्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी आक्रमक भूमिका न घेत, उलट तपासणीची भूमिका स्वीकारली. नेहरूंनी मुस्लिम लीगच्या विधानांना स्पष्ट उत्तर दिले नाही, त्यांचा निषेधही केला नाही; उलट वंदे मातरमची चौकशी सुरू केली.” ते पुढे म्हणाले की, जिन्नांच्या विरोधानंतर फक्त पाच दिवसांनी, म्हणजे २० ऑक्टोबर १९३७ रोजी, नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून जिन्नांच्या भावनांशी सहमत असल्याचे दर्शविले. नेहरू पत्रात लिहितात, “मी वंदे मातरमची आनंदमठ पार्श्वभूमी वाचली आहे आणि ते मुस्लिमांना भडकवू शकते,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

Web Title: Vande mataram is very inspiring for me pm modi expresses his feelings on the 150th anniversary of vande mataram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Loksabha
  • parliament winter session 2025
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Winter Session 2025 : वंदे मातरम् वरुन संसदेमध्ये होणार तब्बल 10 तास चर्चा; PM मोदी स्वतः करणार विषयाला सुरुवात
1

Winter Session 2025 : वंदे मातरम् वरुन संसदेमध्ये होणार तब्बल 10 तास चर्चा; PM मोदी स्वतः करणार विषयाला सुरुवात

Putin यांचा रेड कार्पेट दौरा संपला, आता येणार ‘Zelensky’; नवी दिल्लीत शांतता फॉर्म्युला; Modi सरकारचा आंतरराष्ट्रीय टायट्रॉप वॉक
2

Putin यांचा रेड कार्पेट दौरा संपला, आता येणार ‘Zelensky’; नवी दिल्लीत शांतता फॉर्म्युला; Modi सरकारचा आंतरराष्ट्रीय टायट्रॉप वॉक

Russian Crude Import: ट्रॅम्प यांचे रशियन कंपन्यांवर निर्बंध, एमआरपीएल-एचएमईएलचा मोठा निर्णय..; रशियन तेल खरेदी थांबवली
3

Russian Crude Import: ट्रॅम्प यांचे रशियन कंपन्यांवर निर्बंध, एमआरपीएल-एचएमईएलचा मोठा निर्णय..; रशियन तेल खरेदी थांबवली

Winter Session 2025: ऑफिसच्या वेळेनंतर बॉस तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही…; संसदेत डिस्कनेक्ट बिल सादर, नेमकं काय आहे यात?
4

Winter Session 2025: ऑफिसच्या वेळेनंतर बॉस तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही…; संसदेत डिस्कनेक्ट बिल सादर, नेमकं काय आहे यात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.