५०० कोटींची ‘सुटकेस’ दिली तरच मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवर कोणी केले गंभीर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, नवज्योज कौर सिद्धू यांनी शनिवारी पंजाबचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला. नवज्योत कौर म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये जो कोणी ५०० कोटी रुपयांची सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो. पण आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या खूर्चीवर बसण्यासाठी ५०० कोटी रुपये नाहीत. जर कोणताही पक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब सुधारण्याची संधी देतील तर तेदेखील त्याचे निकाल दाखवून देतील. राज्याचे सुवर्ण पंजाबमध्ये रुपांतर करतील. दरम्यान, गेल्या काही काळापासून नवज्योत सिंग सिद्धू राजकारणापासून दूर आहेत. पण आता त्यांच्या पत्नीने थेट काँग्रेस नेतृत्त्वावर निशाणा साधत पतीच्या राजकारणात परतण्यासोबत पक्ष बदलाचेही संकेत दिले आहेत.
नवज्योत कौर सिद्धू यांच्या विधानानंतर पंजाबच्या राजकारणात नव्या आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे. आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नील गर्ग यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, “३५०-५०० कोटी रुपयांना मुख्यमंत्रिपद विकणे हे राजकारण नसून भ्रष्टाचाराचा उघड लिलाव आहे.” कौर यांच्या आरोपांनंतर भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी कोणाचेही नाव न घेता, “काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी पात्रतेचे अनेक निकष आहेत. मला कुणीतरी सांगितले होते की कोणीतरी ३५० कोटी रुपयांना मुख्यमंत्रीपद मिळवले.”असा आरोपाही त्यांनी केला
तसेच, “या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची स्थिती नक्की कुठे पोहोचली आहे? आमच्याकडे ३५० किंवा ५०० कोटींचा ऑडिओ पुरावा नाही; कदाचित नवज्योत कौर सिद्धूंकडे असेल.” असेही त्यांनी नमुद केलं. माझ्याकडे खरूर साहिबचे माजी खासदार जसबीर सिंग डिंपा यांचे एक जुने ट्विट आहे, ज्यात काँग्रेसने “डाकू” बसवल्याचा आरोप करण्यात आला होता. “हे डाकू आजही काँग्रेसमध्ये आहेत आणि सत्तेची महत्वाची पदे भूषवत आहेत,” असा आरोप जाखड यांनी केला.
Maharashtra Winter Session Live : विरोधकांना उरला नाही आवाज? इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहा
काँग्रेसवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर अवघ्या काही तासांत नवज्योत कौर यांनी त्यांच्या ५०० कोटी रुपयांच्या विधानावर यू-टर्न घेतला आहे. ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीच्या अर्थाने तो दाखवण्यात आला. करण्यात आला. माझे विधान इतक्या साधेपणाने दिले असतानाही त्याचा विपर्यास केला गेला, याचे मला आश्चर्य आहे. काँग्रेस पक्षाने कधीही आमच्याकडे काही मागितले नाही, हे स्पष्ट सांगू इच्छिते.”
ज्यावेळी मला इतर कोणत्या पक्षाकडून नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री पदाच्या ऑफर देण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी पैसे नाहीत. हे स्पष्टपणे सांगितले होते. पण हे विधान चुकीच्या पद्धतीने काँग्रेसच्या मुख्यमंत्री उमेदवाराशी जोडण्यात आले. तसे अजिबात नाही.” असंही कौर यांनी स्पष्ट केलं.






