varun gandhi
पिलीभीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी लोकसभा उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यासाठी पिलीभीत येथे पोहोचले. येथे त्यांनी सभेला संबोधित केले. पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांच्या जागी भाजपने जितिन प्रसाद यांना तिकीट दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत वरुण गांधी दिसले नाहीत. तिकीट कापल्यापासून वरुण गांधी तेथून बेपत्ता आहेत. त्यांनी अद्याप पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही किंवा निवडणूक प्रचारातही सहभाग घेतला नाही.
नुकतेच वरुण गांधी यांच्या आई आणि सुलतानपूरच्या भाजपाच्या उमेदवार मेनका गांधी यांना त्यांच्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले होते, ‘वरुण गांधी आणि त्यांची पत्नी आजारी आहेत, दोघेही विश्रांती घेत आहेत. मात्र, त्यानंतरही वरुण गांधींबाबत राजकीय प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वरुण यांनी यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेपासून स्वतःला दूर केले होते. आता ते मोदींच्या रॅलीतही दिसले नाहीत.
वरुण गांधी पिलीभीतमधून दोनदा खासदार झाले आहेत. मात्र, यावेळी त्यांचे तिकीट पक्षाने कापले आहे. पिलीभीत येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, तुमच्या एका मताने असे सरकार स्थापन झाले आहे, ज्यामुळे जगभरात भारताचा गौरव होत आहे. काँग्रेस सरकार नेहमीच मदत मागते पण आता भारत मदत करतो.