उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ मतदान
09 Sep 2025 03:55 PM (IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ७६२ मतदान झाले. आतापर्यंत ९६ टक्के मतदान झाले आहे.
09 Sep 2025 02:29 PM (IST)
माजी पंतप्रधान आणि राज्यसभेतील जेडीएस खासदार एचडी देवेगौडा उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी संसद भवनात पोहोचले.
09 Sep 2025 01:16 PM (IST)
केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि डिंपल यादव यांनीसंसद भवनात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.
09 Sep 2025 01:14 PM (IST)
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सूचक ट्विट केले आहे. अखिलेश यादव यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्या सोबत एक फोटो ट्विट करत @ संसद कार्यकाल' अशी पोस्ट केली आहे.
@ संसद कार्यालय। pic.twitter.com/periP3JIUQ
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 9, 2025
09 Sep 2025 01:02 PM (IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसद भवनात पोहोचले.
#WATCH | Delhi | Union Home Minister Amit Shah arrives at the Parliament House to cast his vote for the Vice Presidential election.
(Source: Sansad TV) pic.twitter.com/p7o46WfteB
— ANI (@ANI) September 9, 2025
09 Sep 2025 01:00 PM (IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यादरम्यान, एक अतिशय मनोरंजक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडीओत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजप नेते नितीन गडकरी हसत-हसत आणि हातात हात घालून संसदेत प्रवेश करताना दिसते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीसाठी मतदान केले.
09 Sep 2025 12:39 PM (IST)
राजधानी दिल्लीत आज (९ सप्टेंबर) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून रात्रीपर्यंत निकालही जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि ‘इंडिया’ ब्लॉकचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहेत. इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित एनडीए मधील खासदार आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचे दावे करताना दिसत आहेत. पण त्याचवेळी मतदानापूर्वीच बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल या तीन पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही पक्षांकडे मिळून १४ खासदार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा अधिक रंजक ठरली आहे.
वाचा सविस्तर- उपराष्ट्रपती निवडणुकीपासून या पक्षांनी फिरवली पाठ
09 Sep 2025 12:03 PM (IST)
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्मविश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “विरोधी पक्षाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना जिंकण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत.” इंडिया ब्लॉकने माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून उभे केले असून त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी होणार आहे.
09 Sep 2025 11:39 AM (IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधीही मतदान करण्यासाठी पोहोचल्या. याशिवाय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मतदान केले आहे. दोन्ही सभागृहांचे सदस्य आलटून पालटून मतदान करत आहेत.
09 Sep 2025 11:05 AM (IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांना मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून दिलेल्या विशेष पेनचा वापर करावा लागतो. या पेनमध्ये खास प्रकारची शाई वापरलेली असते. लोकसभेच्या माजी सरचिटणीस स्नेहलता श्रीवास्तव यांनी सांगितले की, मतदानाची गुप्तता राखण्यासाठी ही विशेष शाई उपयुक्त ठरते. सर्व खासदार एकाच प्रकारच्या पेन आणि शाईने मत नोंदवतात, त्यामुळे कोणत्या खासदाराने कोणाला मतदान केले आहे हे उघड होत नाही. जर मतदाराने आयोगाने दिलेल्या पेनऐवजी दुसरे पेन वापरले, तर त्या खासदाराचे मत अवैध ठरते. २०१७ च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत अशा कारणामुळे ११ मते तर २०२२ मध्ये तब्बल १५ मते अवैध ठरली होती.
09 Sep 2025 11:00 AM (IST)
एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज सकाळी दिल्लीतील लोधी रोडवरील श्री राम मंदिरात पूजा केली. उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार असून संध्याकाळी मतमोजणी होईल. या निवडणुकीत राधाकृष्णन यांचा सामना विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्याशी होणार आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
09 Sep 2025 10:52 AM (IST)
काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, "उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका का होत आहेत? माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी खूप मजबूत आहेत म्हणून एनडीएला निवडणुकीत बहुमत सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. मला आशा आहे की निकाल आमच्या बाजूने लागतील."
09 Sep 2025 10:37 AM (IST)
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी प्रतिक्रीया दिली आह. "मला खात्री आहे की आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. मी फक्त लोकांचा विवेक जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. क्रॉस-व्होटिंग होईल असे मी म्हटले नाही.
09 Sep 2025 10:33 AM (IST)
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी दक्षिण भारतातील नेते सी.पी. राधाकृष्णन यांची निवड केली आहे. राधाकृष्णन हे तामिळनाडूतील तिरुपूरचे रहिवासी असून ते ओबीसी समुदायाचे आहेत. पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांना ‘तामिळनाडूचे मोदी’ म्हणूनही ओळखले जाते. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघडीनेही “दक्षिण विरुद्ध दक्षिण” अशी लढत कायम ठेवत आंध्र प्रदेशातील जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. रेड्डी हे आंध्र प्रदेशातील सामान्य जातीतून येतात.
09 Sep 2025 10:30 AM (IST)
केंद्रीय मंत्री लल्लन सिंह म्हणाले, "आपण निश्चितच निवडणुका जिंकू. छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये नक्षलवाद ही एक मोठी समस्या होती आणि विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्या निर्णयामुळे तेथे अनेक समस्या निर्माण झाल्या."
09 Sep 2025 10:28 AM (IST)
उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर ते संसद भवनाबाहेर पडले.
Vice President Election 2025 live update: : देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (९ सप्टेंबर) मतदान होणार आहे. या पदासाठी सत्ताधारी एनडीए आघाडीने सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली असून, विरोधी इंडिया आघाडीकडून माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी हे मैदानात आहेत. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही दावेदार दक्षिण भारतातील आहेत.
एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास उल्लेखनीय मानला जातो. ते तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष राहिले असून, भाजपला दक्षिणेत बळकटी देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे.
राधाकृष्णन यांनी १९९८ आणि १९९९ मध्ये कोइम्बतूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली होती. अवघ्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. १९७४ मध्ये त्यांची भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारी समितीवर नियुक्ती झाली. याशिवाय ते महाराष्ट्र, झारखंड आणि तेलंगणात राज्यपालपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी हे कायदा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व मानले जाते. ते तेलंगणातील असून आंध्र प्रदेश, गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिले. २००७ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच ते गोव्याचे पहिले लोकायुक्त होते, मात्र सात महिन्यांतच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.