मोठी बातमी! लोकसभेत सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक, दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून मारली उडी!

कामकाजाला उपस्थित खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांच्या हातात अश्रुधुराचे डबे होते.

    नवी दिल्लीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन जणांनी सभागृहात प्रवेश केला. या दोन्ही व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याची (Loksbaha Visitors Gallery) धक्कादायक माहिती समोर आली आहे.  कामकाजाला उपस्थित खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्याही  हातात अश्रुधुराचे डबे होते. मात्र, त्यांना खासदारांनी पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

    नेमकं काय घडलं?

    संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज लोकसभेचं कामकाज सुरू असताना सभागृहात दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून संदसेद उतरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घटनेतील तरुणांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यापैकी एका घटनेतील तरूण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले.

    प्रेक्षक सभागृहाचा पास बनवून मिळवला प्रवेश

    म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास (परवाना) बनवून घेतला होता. दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे