Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा; सोनिया गांधी म्हणाल्या, ‘राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले, ते आता…’

नव्या संसद इमारतीमध्ये कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यात लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2023 | 11:50 AM
महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा; सोनिया गांधी म्हणाल्या, ‘राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले, ते आता…’
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : नव्या संसद इमारतीमध्ये कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यात लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी महिला आरक्षण विधेयकाला (Women Reservation) काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा होत आहे. त्यामध्ये सोनिया गांधी यांनी पाठिंबा देत म्हटलं की, ‘महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पक्ष पाठिंबा देत आहे. मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभी आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारे विधेयक माझे पती राजीव गांधी यांनीच आणले होते. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले आहे, ते या विधेयकाच्या मंजूरीमुळे पूर्ण होणार आहे. काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे’.

विधेयक तातडीने मंजूर करावे

हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. पण चिंताही आहे. महिला गेल्या 13 वर्षांपासून राजकीय जबाबदारीची वाट पाहत आहेत. सध्या त्यांना जास्त वेळ थांबायला लावले जात आहे. हे विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, जातीची जनगणना करून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: We support women reservation bill says congress senior leader sonia gandhi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2023 | 11:50 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • india
  • Reservation Bill
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

India Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधांत तणाव; भारतीयांसाठी व्हिसा सेवा केली स्थगित
1

India Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधांत तणाव; भारतीयांसाठी व्हिसा सेवा केली स्थगित

Ambarnath News: ‘त्या’ १२ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश अंबरनाथमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी
2

Ambarnath News: ‘त्या’ १२ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश अंबरनाथमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
3

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
4

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.