
west bengal election 2026 amit shah big claim bjp 110 seats first phase political news
गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “बंगालच्या जनतेने विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बदलासाठी उत्साहाने मतदान करून सर्व विक्रम मोडले आहेत. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या १५२ जागांपैकी ११० पेक्षा जास्त जागांवर भाजप जिंकेल.” असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : लोकशाहीचा ‘सुपर गुरुवार’! तामिळनाडूमध्ये मतदानाची टक्केवारी ८२% पार, तर बंगालमध्ये विक्रमी मतदानाची नोंद
पुढे अमित शाह म्हणाले की, “बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही आणि हे सुनिश्चित केल्याबद्दल मी निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांचे आभार मानतो. तृणमूल काँग्रेस सत्तेतून नक्कीच बाहेर पडेल; भाजप बंगालमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे.” असा दावा त्यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान
अमित शाह म्हणाले की, “पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले, जे बंगालच्या लोकांची बदलाची इच्छा दर्शवते. लोक कोणत्याही भीतीशिवाय मतदानासाठी आले आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) गुंडांना न घाबरता पुढे आले. शाह यांच्या मते, हे विक्रमी मतदान स्पष्टपणे दर्शवते की ममता बॅनर्जी सरकारचा काळ संपला आहे आणि आता बंगालला भाजपचे सरकार हवे आहे.
हे देखील वाचा : “बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन करा आणि आम्ही….,” अमित शाह यांचा तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला
पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला आणि म्हणाले की, “भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर राज्यातील भ्रष्टाचार, सिंडिकेट राजवट, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि घुसखोरी यांसारख्या समस्या संपुष्टात येतील. त्यांनी आश्वासन दिले की, भाजप सत्तेवर आल्यास तरुणांना रोजगार, महिलांना सुरक्षा आणि राज्यासाठी विकासाचे एक नवीन मॉडेल उपलब्ध करून दिले जाईल. शाह यांनी असेही सांगितले की, प्रत्येक घुसखोराला बंगालमधून हाकलून दिले जाईल आणि ‘लव्ह जिहाद’ व ‘लँड जिहाद’ सारख्या घटना पूर्णपणे थांबवल्या जातील” असे अमित शाह म्हणाले आहेत.