मूल्यवर्धित कर (Vat), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी विविध निकषांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (petrol diesel price today) राज्यानुसार बदलतात. इंधन दरांमध्ये शेवटचा देशव्यापी बदल गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला होता, जेव्हा वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केले. केंद्र सरकारने मे 2022 मध्ये उत्पादन शुल्कात कपात केल्यापासून, काही राज्यांनी इंधनावरील व्हॅटच्या किमतीही कमी केल्या आहेत, तर काहींनी पेट्रोल आणि डिझेलवर सेस लावला आहे.
शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली 89.62 96.72
मुंबई 94.27 106.31
कोलकाता 92.76 106.03
चेन्नई 94.24 102.63
देशात विविध भागात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राज्य सरकार इंधनाच्या किमतींवर त्यांच्या पद्धतीनुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतं वेगवेगळी असते. पण जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणुन घ्यायचे असेल तर तुम्ही एसएमएस पद्धतीद्वारे जाणुन घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना दिलेला RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल. हा कोड पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या शहराती किंमत किती आहे ते माहिती होईल.