mohan yadav

  Madhya Pradesh New CM : मध्य प्रदेशला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेले मोहन यादव यांची पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

  MP BJP New CM : मुख्यमंत्र्याच्या नावाची निवड करण्यासाठी सोमवारी मध्य प्रदेशात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदारांनी मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री राहिले आहेत. त्यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे.

  शिवराजांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले
  विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत डॉ. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा ते व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पायाला स्पर्श करताना दिसले आणि शिवराज सिंह यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने त्यांना आशीर्वाद दिला. मोहन यादव हे मध्य प्रदेशातील भाजपचा मोठा ओबीसी चेहरा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असावी. मोहन यादव यांची शैक्षणिक पात्रता पीएचडी आहे. 2020 मध्ये त्यांना शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आणि ते 2023 पर्यंत या पदावर राहिले. त्यापूर्वी

  आतापर्यंतची राजकीय कारकीर्द
  58 वर्षीय मोहन यादव यांची राजकीय कारकीर्द 1984 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाल्यानंतर सुरू झाली. ते आरएसएसचे सदस्यही आहेत. 2013 मध्ये त्यांनी उज्जैन दक्षिणमधून निवडणूक लढवली होती आणि सलग तिसऱ्या निवडणुकीत ते येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा १२९४१ मतांनी पराभव केला. मोहन यादव यांना ९५६९९ मते मिळाली.

  डॉ.मोहन यादव हे भाजपचे अनुभवी नेते 
  मोहन यादव यांच्या नावाची घोषणा उज्जैनच्या जनतेसाठी आश्चर्यापेक्षा कमी नाही कारण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव कुठेही नव्हते, मात्र विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ते 2004 ते 2010 पर्यंत उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते तर 2011 ते 2013 पर्यंत त्यांनी मध्य प्रदेश पर्यटन विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.