एखादी विचित्र किंवा अनपेक्षित घटमना घडल्यावर एकतर त्याला चमत्कार म्हणतात किंवा जगातला आठवा आश्चर्य असं म्हणण्याची पद्धत असते. मात्र या जगात असं रोज काही ना काही होत असतं जे पाहून आणि जाणून घेऊन आपल्याला धक्का बसतो. या अशा घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या अशीच एका बाळाच्या जन्माची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी ऐकून नेटकरी म्हणत आहे असं कुठं असतंय का राव ? पण हो या बाळाच्या जन्माची गोष्टच मुळी धक्कादायक आहे.
सर्वसाधारण सांगायचं झालं तर जन्माला येणारं बाळ हे जास्तीत जास्त पावणे तीन ते तीन किलो इतकं असतं. मात्र जबलपुरच्या एका रुग्णालयात महिलेने बाळाला जन्म दिला आणि त्या बाळाचं वजन पाहून डॉक्टर पुरते चक्रावून गेले. ही घटना आहे मध्यप्रदेशमधली. जबलपुरच्या रानी दुर्गावती रुग्णालयात एक अजब प्रकार घडला आहे. या रुग्णालयातील एका महिलेने तब्बल 5 किलो वजन असलेल्या बाळाला जन्म दिला आहे.
रांझी परिसरात राहणाऱ्या आनंद चौकसे यांच्या पत्नी शुभांगी यांनी बुधवारी या मुलाला जन्म दिला आहे. या आनंदाच्या बातमीने त्या खूप उत्साहित आहेत. तथापि, बाळाचे वजन असामान्यपणे जास्त असल्याने डॉक्टर बाळाला विशेष निरीक्षणाखाली ठेवत आहेत. आता पर्यंत जन्माला आलेल्या बाळांमध्ये ही घटना वेगळी आहे. बाळाचं वजन हे 5 किलो असल्याने डॉक्टरांनी बाळाला 24 डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे. या बाळाच्या जन्माची गोष्ट पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आहे.
बाळ सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून बाळाचं आरोग्य चांगलं असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. मात्र बाळाच्या रक्तातील साखर नियंत्रणात रहावी आहे का किंवा ती रहावी म्हणून बाळाला 24 तासांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे.
सहसा कोणत्याही नवजात बाळाचं वजन इतकं नसतं. मात्र या बाळाच्या वजनाबाबत सांगताना डॉक्टर म्हणाले की, बाळाला सकस आहार आणि योग्य ते पोषण वेळेत मिळालेलं आहे त्यामुळे बाळ सुखरुपपणे जन्माला आलं. गर्भात असताना बाळाचं पोषण योग्यरीत्या झालेलं आहे मात्र अशा बाळांना जन्म झाल्यानंतर बाहेरच्या जगाशी जुळवून घेताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे बाळाला भविष्यात कोणताही गंभीर आजार होऊ नये किंवा कोणत्याही पिढीजात आजाराला त्याला धोका नसावा यासाठी डॉक्टरांची तपासणी सुरु आहे.