Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल
पण सध्या मोजतबा खामेनेई गायब असल्याने खळबळ उडाली आहे. मोजतबा खामेनेई नेमकं कुठे आहेत, त्यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला का अशा चर्चा सुरु आहेत. कारण २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर मोजतबा खामेनेई सार्वजनिकरित्या कुठेच दिसले नाही. नुकत्याच समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार, मोजतबा खामेनेई हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी याची अधिकृत पुष्टी केली आहे.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई यांचे वडील आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोजतबा खामेनेई यांची आई आणि त्यांची पत्नी देखील ठार झाली असल्याचे वृत्त आहे. सायप्रयास मधील इराणचे राजदूत अलीरेजा सालारियन यांनी याची पुष्टी केली आहे. मोजतबा देखील हल्ल्यावेळी घटनस्थळी उपस्थित होते, परंतु या हल्ल्यातून ते बचावले असल्याचे अलीरेजा यांनी म्हटले आहे. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा खामेनेई शुद्धवर असून सध्या ते एका सुरक्षित आणि गुप्त बंकरमध्ये आहेत. त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहेत. येथूनचे ते महत्वाच्या आणि मर्यादित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून देशाचा कारभार चालवत असल्याचे म्हटले जात आहे.
काही प्रशासयकी जबाबदाऱ्या महत्वाच्या व्यक्तींकडे सोपवण्यात आल्या आहेत. सध्या इराणमध्ये मोजतबा खामेनेई यांच्या सर्वोच्च नेतेपदी निवडीमुळे देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. राजेशीही समर्थकांनी याला तीव्र विरोध केला आहे. परंतु त्यांच्या समर्थकांकडून त्यांना पाठिंबाही मिळत आहे.
दरम्यान याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोजतबा यांच्या निवडीवर आधीच कडक शब्दांत टीकाही केली होती. तसेच त्यांनी आणि इस्रायलनेही कोणत्याही नव्या नेत्याला सत्तेत टिकून देणार नाही, त्यांचाही खात्मा करु अशी धमकी दिली होती.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे नवे सुप्रीम लीडर अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला बॉम्बस्फोटांच्या धक्क्यांमुळे गंभीर दुखापत झाल्याचे इराणने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे.
Ans: सुरक्षेच्या कारणास्तव मोजतबा खामेनेई सध्या एका गुप्त आणि सुरक्षित बंकरमध्ये असल्याची माहिती ईराणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Ans: सध्या इराणमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. सैन्य आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्स यांनी नव्या सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांना पाठिंबा दिला आहे, तर काही ठिकाणी विरोध होत आहे.






