गुजरातच्या ‘या’ गावाला मिळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा मान, पंतप्रधान मोदींनी फोटो केला शेअर!

पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान केवळ भारतीय पर्यटनाची क्षमताच अधोरेखित करत नाही तर कच्छ प्रदेशातील लोकांचे समर्पण देखील अधोरेखित करतो.

    संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने ( United Nations World Tourism Organisation) गुरुवारी गुजरातमधील धोर्डो गावाला सर्वोत्तम पर्यटन गाव (Best Tourism village Dhordo) म्हणून घोषित केले. याचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोर्डो गावाचे फोटो शेअर करून आंनद व्यक्त केला.  गावातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यावर अधोरेखित करणारे काही फोटो त्यांनी शेयर केले. पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान केवळ भारतीय पर्यटनाची क्षमताच अधोरेखित करत नाही तर कच्छ प्रदेशातील लोकांचे समर्पण देखील अधोरेखित करतो.

    त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेयर करत म्हण्टलं की, मी माझ्या 2009 आणि 2015 मध्ये धोर्डोला दिलेल्या भेटींच्या काही आठवणी शेअर करत आहे. मी तुम्हा सर्वांना तुमच्या धोर्डोच्या मागील भेटींच्या आठवणी सांगण्यासाठी आमंत्रित करतो. यामुळे अधिक लोकांना प्रवास करण्याची प्रेरणा मिळेल.

    पियुष गोयल यांनी रण उत्सवाचे फोटो शेअर केले आहेत

    केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रण उत्सवाचे फोटो शेअर करताना धोर्डो गावाला UN कडून मिळालेल्या सन्मानाबद्दल अभिनंदन केले आहे.
    याआधी, पर्यटन मंत्रालयाने जाहीर केले होते की धोर्डोला हा सन्मान शाश्वत आणि जबाबदार पर्यटनासाठी त्यांच्या अपवादात्मक योगदानासाठी मिळाला आहे. कच्छच्या वाळवटांमध्ये असलेल्या धोर्डोमध्ये, वार्षिक रण उत्सव आयोजित करण्यात येतो. हा एक सांस्कृतिक उत्सव आहे जो प्रदेशातील पारंपारिक कला, संगीत आणि हस्तकला प्रदर्शित करतो.