(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
जगातील आघाडीच्या बँकांमध्ये भारतीय बँकांचा समावेश करण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. पीएम मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताला केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवायचे नाही तर बँकिंग, फार्मा, उत्पादन, तंत्रज्ञान आणि संरक्षण यासारख्या अनेक क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांमध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात संबोधत करताना सांगितले की, भारताचे बँकिंग क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे, जगातील अव्वल ५ बँकांमध्ये किमान एक भारतीय बँक असावी, हे देशाचे ध्येय असले पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, भारताच्या बँकिंग क्षेत्राने लक्षणीय प्रगती केली आहे आणि आता भारतीय बँकांनी जागतिक स्तरावर आपले मजबूत स्थान निर्माण केले पाहिजे.
पंतप्रधान मोदींनी औषधनिर्माण क्षेत्रासाठीही एक मोठे ध्येय समोर ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, भारताने औषधनिर्माण उद्योगात लक्षणीय प्रगती केली आहे, परंतु आता जगातील अव्वल ५ औषधनिर्माण कंपन्यांमध्ये किमान एक भारतीय कंपनी असण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, भारताने जागतिक औषधनिर्माण क्षेत्रात आपले स्थान आणखी मजबूत केले पाहिजे.
VIDEO | Independence Day 2026: Addressing the nation from ramparts of Red Fort, PM Modi, says, “I want to awaken the nation, and I also want to awaken the strength of the nation. A nation is not just about the government… a nation is made up of every citizen. We often hear… pic.twitter.com/bnU1Kav4xu — Press Trust of India (@PTI_News) August 15, 2026
आपल्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी भारताच्या विकासासाठी “सात शक्ती प्रवाह” म्हणजेच सात प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. यामध्ये उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, वेगवान शक्ती, संरक्षण शक्ती, हरित आणि नील अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर यांचा समावेश आहे.

