रिलच्या नादात तरुणीने गमावले दोन्ही हात; रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ बनवताना झाला भीषण अपघात (संग्रहित फोटो)
रांची : सोशल मीडियावर रील बनवण्याचा नाद अनेकदा जीवावर बेततो. झारखंडमधील गढवा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे ट्रॅकजवळ मित्रांसोबत रील बनवत असताना १९ वर्षीय पूर्णिमा कुमारी हिला धावत्या ट्रेनने धडक दिली. या भीषण अपघातात तिचे दोन्ही हात शरीरापासून वेगळे झाले असून, शरीराच्या इतर भागांनाही गंभीर दुखापत झाली आहे. प्रकृती गंभीर आहे.
पूर्णिमा कुमारी काही मित्रांसोबत रईसा परिसरातील रेल्वे रुळाजवळ गेली होती. सर्वजण मोबाईलवर व्हिडीओ आणि रील बनवण्यात व्यस्त होते. याचवेळी रांचीहून चोपनच्या दिशेने जाणारी रांची-चोपन एक्स्प्रेस वेगाने आली. ट्रेनची गती आणि स्वतःपासूनचे अंतर याचा योग्य अंदाज पूर्णिमाला आला नाही आणि ती ट्रेनच्या धडकेत सापडली. या अपघातात तिचे दोन्ही हात कटून वेगळे झाले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. तिच्यासोबत असलेल्या मित्रांनी तातडीने तिला गढवा सदर रुग्णालयात दाखल केले.
Jalgaon Accident news : काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल
दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडिया रील आणि व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे ट्रॅक, उंच इमारती, धबधबे, नद्या किंवा अन्य धोकादायक ठिकाणी केवळ काही व्ह्यूज आणि लाइक्स मिळवण्यासाठी स्टंट करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. क्षणिक प्रसिद्धीसाठी घेतलेला धोका आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली आहे.
एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल
दुसरीकडे, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी पहाटे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण गाव हादरले. पहाटेच्यावेळी पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले असे एकाच कुटूंबातील चौघेजण बाहेर पडले होते. काही वेळातच रेल्वे मार्गावर आपलं जीवन संपवल्याची माहिती ग्रामस्थ व परीसरापर्यंत पोहचली आणि सर्वत्र शोककळा पसरली.
येरवडा जेलमध्ये शिजला होता सायबर फसवणुकीचा कट; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून भावी डॉक्टरसह दोघांना अटक






