औरंगाबाद : जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघात वेगवेगळ्या विकासकामांना लागणारा निधी लवकर मिळावण्यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या घाटात रखडलेले कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक असते.
[read_also content=”नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी अचानक बेपत्ता https://www.navarashtra.com/latest-news/a-young-woman-who-had-lodged-a-rape-complaint-against-ncps-mehboob-sheikh-has-suddenly-gone-missing-nrvk-73505.html”]
अरुंद रस्ता आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघातांच्या प्रामाणात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या रस्त्याचे अरुंदीकरणाच्या कामासाठी निधी मंजुर केला आहे. या रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून अजिंठा घाटात काही काम रखडलेले आहे. हे काम तात्काळ मार्गी लावण्याची मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
दलित वस्ती कार्यक्रमासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देणे. मतदारसंघातील विकासकामांसाठी गौणखनिज स्वामित्व धनाच्या हिस्स्यातील जास्तीतजास्त रक्कम मिळावी अशा मुद्यांबाबत अब्दुल सत्तार यांनी यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सूचना मांडली आहे.