(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने रविवार, ८ फेब्रुवारी रोजी खास बेबी शॉवरचे आयोजन केले होते. सोनम कपूरच्या स्टाईलप्रमाणेच हा कार्यक्रम अतिशय जवळचा, सुंदर आणि सहज स्टायलिश होता. पती आनंद आहुजासोबत तिच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार असलेल्या सोनमने तिच्या मुंबईतील घरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. .या खाजगी कार्यक्रमाला कपूर कुटुंबातील सदस्यांसह बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
बेबी शॉवरसाठी सोनमने लाईम ग्रीन रंगाचा अत्यंत सुंदर असला लहंगा परिधान केला होता. सोनमने तिचे स्टायलिंग कमीत कमी पण प्रभावी ठेवले. तिचे केस एका आकर्षक अंबाड्यात बांधलेले होते. यामध्ये तिने बेबी बंप पूर्णपणे रिव्हील केलेला दिसत आहे. सोनमने आत्मविश्वासाने आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. काहींनी तिच्या या स्टाईलवरून तिला ट्रोलही केलं आहे. ‘आधी बेबी बंप दाखवायचं आणि नंतर मुलांचे चेहरे लपवायचे’ असं म्हणते एका नेटकऱ्याने सेलिब्रिटींना अप्रत्यक्षपणे सुनावलंच आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहरे या सोहळ्याला उपस्थित होते. करीना कपूर खान निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये आली होती आणि गोटा पट्टीचे डिटेलिंग होते, तिचे केस व्यवस्थित बांधलेले होते आणि तिने कानातले आणि बिंदी घातली होती. खुशी कपूरने पांढरी आणि पिवळी साडी घातली होती, तिचे केस उघडे ठेवले होते आणि मोत्याच्या चोकर आणि कानातल्यांनी तिचा लूक पूर्ण केला होता.
पाहुण्यांच्या यादीत भूमी पेडणेकर, शबाना आझमी, मसाबा गुप्ता आणि अनिल कपूर, अंशुला कपूर आणि महीप कपूर सारखे कपूर कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता.






