अभिनेता, मॉडेल व बॉडिबिल्डर साहिल खानला(Sahil Khan Wants To Work In Marathi Movie) मराठी चित्रपटात काम करायचंय आहे. साहिलनं हिंदीमध्ये ‘स्टाइल’, ‘एक्सक्यूज मी’, ‘डबल क्रॉस’, ‘अलादिन’ या चित्रपटात काम केलं आहे. पुण्यातील एफ. सी. रोडवरील त्याच्या बायसेप्स दुकानाच्या उद्घाटनासाठी(Sahil Khan InPune For Inaugaration) तो नुकताच पुण्यात (Pune) आला होता.त्यावेळी त्याने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
[read_also content=”मुंबईकरांच्या पैशांची लूट सुरु – पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची माजी उपमहापौरांची मागणी https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/ex-deputy-mayor-babubhai-bhawanji-damand-inquiry-of-corruption-in-bmc-nrsr-212667.html”]
यावेळी बोलताना साहिल म्हणाला की, मलासुद्धा मराठी चित्रपटात काम करायचं आहे. करिअरच्या सुरुवातीला एन. चंद्रांसारख्या मराठीतील दिग्गज दिग्दर्शकानं मला चित्रपटात काम करण्यासाठी संधी दिली. माझा मित्र परिवार सर्व मराठीच आहे. माझं कुटुंब पुण्यात राहतं. मला महाराष्ट्रानं भरभरून दिलं आहे. मराठी चित्रपट मी बघतो. मराठी चित्रपट आशयघन आणि आयुष्याला दिशा देणारे असतात म्हणून मराठी चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा आहे.
बॉडिबिल्डिंग करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. नियमित न चुकता व्यायाम योग्य आहार योग्य विहार फार महत्त्वाचे आहे. नशा आणणारे पदार्थ व चुकीच्या सवयींपासून तरुणांनी दूर राहावं. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार, वेळेत झोप घेणं फार गरजेचं आहे. उत्तम आरोग्यासाठी रोज व्यायाम करणं हा जीवनाचा गुरुमंत्र असल्याचंही साहिल म्हणाला.