Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, 'या' प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा
एयरटेल त्यांच्या पोस्टपेड यूजर्सना मोफत अनलिमिटेड इंटरनेट ऑफर करत आहे. यामध्ये यूजर्सना संपूर्ण महिन्याला 300GB इंटरनेट ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच यूजर्सना दररोज 10GB डेटा वापरण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर 4G आणि 5G दोन्ही नेटवर्क वापरस असलेल्या यूजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीच्या या खास प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि डेली 100 फ्री एसएमएसची देखील सुविधा मिळणार आहे. पोस्टपेड प्लॅन वापरणाऱ्या सर्व यूजर्ससाठी कंपनी ही खास ऑफर घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये इंडिविजुअल यूजर्स, फॅमिली किंला एयरटेल ब्लॅक यूजर्स, सर्वांना अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळणार आहे. फॅमिली प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना सर्व सिमसोबत 300GB डेटा मिळणार आहे. यामध्ये केवळ प्रायमरी यूजर्सचा ऑफरचा लाभ मिळेल, अशी कोणतीही अट नाही. याबाबत कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर स्पष्टपणे माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीचे प्रीपेड यूजर्स अगदी सोप्या पद्धतीने पोस्टपेडमध्ये स्विच करू शकतात. यासाठी त्यांना सिमकार्ड बदलण्याची देखील गरज नाही. दरम्यान, इतर ऑपरेटर्सचे यूजर्स एमएनपीद्वारे एअरटेलचा पोस्टपेड प्लॅन मिळवू शकतात. ते एअरटेल वेबसाइट किंवा एअरटेल थँक्स अॅपद्वारे पोस्टपेड कनेक्शनची विनंती करू शकतात.
कंपनीच्या इंडिविजुअल प्लॅनची किंमत 449 रुपयांपासून सुरु होते. तर फॅमिली प्लॅनची किंमत 699 रुपयांपासून सुरु होते. पोस्टपेड यूजर्सना प्लॅनच्या किंमतीव्यतिरिक्त 18% GST द्यावा लागतो. यूजर्सना गूगल वन क्लाउड स्टोरेज, एयरटेल एक्सस्ट्रीम प्ले, जिओहॉटस्टार, अॅडोब प्रो सारखे इतर फायदे मिळतात. प्रत्येक पोस्टपेड प्लॅनसोबत यूजर्सना मंथली डेटा वेगळा मिळतो. उदाहरणार्थ, 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 50 जीबी डेटा मिळतो. तर अनलिमिटेड प्लॅनमध्ये एकूण 350 जीबी डेटा मिळतो.






