‘जय मल्हार’मध्ये बानू आणि त्यानंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया या भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा केसकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.ईशा केसकर ही मागील वर्षी म्हणजे २०२० मध्ये गोव्याला गेली होती. त्या वेळी गोव्याच्या बीचवर काढलेला हा तिचा मोनोकिनी मधील फोटो खूप व्हायरल झाला आहे.
हा फोटो शेअर करताना इशाने कॅप्शन लिहीलं आहे की, “माझ्यासोबत २०२० मध्ये घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट”. ईशाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पण या ईशाला अनेकांनी ट्रोलही केलं आहे. मराठी अभिनेत्रींनी असे कपडे घालू नयेत असं म्हणत ईशाला ट्रोल करायला सुरूवात केली. त्यानंतर ईशाने फोटो खालील कमेंट सेक्शन बंद केला.
[read_also content=”मनोरंजन‘बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो- उर्मिला मातोंडकर https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/bollywood-is-safe-becouse-of-balasaheb-thakrey-say-urmila-matondkar-nrst-80572/”]
ईशाचे असे अनेक हॉट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर पाहायला मिळतात. अभिनेत्री ईशा केसकर हि सध्या अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करतेय. लवकरच ते लग्न करणार असल्याचं म्हटले जात आहे.
अभिनेत्री ईशा केसकर ही जय मल्हार या मालिकेत बानू बाई च्या भूमिकेत झळकत होती. त्यानंतर ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत भूमिकेत होती पण २०२० मध्ये तिचे ऑपरेशन झाल्याने तिने ही मालिका सोडली.