भारताने SCO सदस्यत्व केले रद्द? 'या' मुस्लिम देशाने पंतप्रधान मोदींवर केला संपात व्यक्त; म्हणाले, 'पाकिस्तानशी मैत्री.... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Azerbaijan News in Marathi : एक मोठी खळबळजनक माहिती. अझरबैजान (Azerbaijan ) या मुस्लिम देशाने भारतावर गंभीर आरोप केला आहे. अझरबैजानने म्हटले आहे की, भारताने चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेचा (SCO) सदस्यत्वाचा अझबैजानचा अर्ज रोखला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणा मोठी खळबळ उडाली आहे.
हा आरोप अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा पंतप्रधान मोदींनी एसीओच्या परिषदेत उपस्थिती दर्शवली होती. शिवाय याच वेळी भारताच्या शत्रू देशासोबतही अझरबैजानची मैत्री वाढत आहे. अझबैजानने अनेक वेळा भारतविरोधी पाकिस्तानची साथ दिली आहे. या कारणांमुळे भारचाने SCO मधील त्यांचे सदस्यत्व रोखल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे.
अझबैजानच्या माध्यमांनी दावा केला आहे. चीनच्या तियानजिनमध्ये झालेल्या SCO परिषदेत अझरबैजान उपस्थित होता. यावेळी अझरबैजानच्या SCO परिषदेत सामील होण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला चीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाठिंबा दिला होता. परंतु भारताने याला विरोध केला.
अझबैजानच्या माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, भारताने अझरबैजानचे पाकिस्तानशी असलेल्या संबंधामुळे त्यांचा अर्ज रोखल्याचे म्हटले आहे. हे SCO परिषदेच्या नियमाविरुद्ध असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.अझरबैजानच्या माध्यमांनी दिलेल्या अहवालात, इल्हम अलीयेव यांनी भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर अझरबैजानविरुद्ध कारवाई करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान अझरबैजानच्या या आरोपांवर अद्यापर भारतीय सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच चीनने देखील या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
पाकिस्तानने गेल्या काही काळापासून राजनैतिक दृष्ट्या मोठी पावले उचलत आहे. पाकिस्तान नुकतेच भारताचा मित्र देश आर्मेनियाशी राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी पाऊल उचलले आहे. तसेच आर्मेनियाने देखील यासाठी सहमती दर्शवली आहे. हा प्रयत्न अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अझबैजान आणि आर्मेनियामध्ये शांतता करार घडवून आणला. यापूर्वी पाकिस्तानने आर्मेनियाविरोधात अनेक वेळा अझरबैजानला साथ दिली आहे. पण आता मात्र आर्मेनियाशी संबंध सुधारत आहे. यामुळे भारतासाठी मोठा धोका निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
पाकिस्तान अझरबैजानचे संबंध
पाकिस्तानन आणि अझरबैजानचे संबंध अनेक काळापासून चांगले आहेत. अझरबैजानने पाकिस्तानला अनेकवेळा भारतविरोधी साथ दिली आहे. काश्मीर मुद्यावरही भारतविरोधी विधाने केली आहेत. यामुळेच मोदींनी शी जिनपिंग यांच्याशी बोलूवन त्यांचे सदस्यत्व रोखले असल्याचे अझरबैजानच्या माध्यमांनी म्हटले आहे.
Donald Trump Announcement: डोनाल्ड ट्रम्प राजीनामा देणार? आज रात्री होणार मोठी घोषणा, चर्चांना उधाण