धार्मिकदृष्ट्या कापूरचं महत्व मोठं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, कापूर घरात जाळल्याने नकारात्मक शक्ती दूर होते. पूजा कराताना कापूर जाळल्याने देवदेवता प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणेच आयुर्वेदातही कापराचे असंख्य फायदे आहेत.
आयुर्वेदात कापूरचे असंख्य फायदे सांगितले आहेत. कापराचा उपयोग आयुर्वेदात, आणि पारंपरिक औषधांमध्ये अनेक वर्षांपासून केला जात आहे. यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल व वेदनाशामक गुणधर्म असतात, जे विविध आजारांवर उपयोगी पडतात.
जंतूनाशक कापूर
वैज्ञानिकदृष्ट्या कापूराचे अनेक फायदे आहेत. कापूर जंतूं नाशक आहे. फोड, खाज आणि त्वचारोगांवर उपयोगी ठरतो. तुम्हाला जर त्वचेच्या समस्या वारंवार होत असतील अंघोळीच्या पाण्यात कापूर तेल किंवा भिमसेनी कापूर पाण्यात मिसळा आणि या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेचे आजार दूर होतात.
मानसिक तणाव
शारीरिक व्याधींप्रमाणे कापूर मानसिक नैराश्यावर देखील चांगला परिणाम करतं. सतत अतिविचारांमुळे मानसिक ताण तणाव येत असेल तर कापूर यावर रामबाण उपाय आहे. मानसिक तणाव जाणवत असल्यास घरात कापूर जाळा. कापूरच्या वासाने मेंदूवरील अतिरिक्त ताण कमी होतो. तुम्ही जर मेडिटेशन करत असाल तर धूप आणि कापूर जाळा. अशाने मन एकाग्र होण्यास मदत होते.
कापराचा वास मेंदूतील तणाव कमी करतो व मानसिक शांतता निर्माण करतो. यामुळे झोप न लागणे, डोकेदुखी व तणाव असे निद्रानाशाचा त्रास जाणवत असेल तर कापूर य यावर फायदेशीर आहे.
कापराचा नैसर्गिक गुणधर्म हा थंडावा देणारा आहे. त्यामुळे सांधेदुखी, स्नायू दुखी यावर देखील कापराच्या उपायाने आराम मिळतो. तेलात मिसळून कापूर त्वचेवर लावल्यास वेदना कमी होतात. तसेच, कापूराची वाफ घेणे श्वसनमार्गातील अडथळा दूर करते. त्यामुळे कफ, सर्दी, दम्याचे त्रास यावर तो उपयोगी ठरतो.
कापूर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून सुद्धा वापरला जातो. त्याचा वास डास, मुंग्या व झुरळांना दूर ठेवतो. घरात कापूर जाळल्यास वातावरण शुद्ध राहते. याशिवाय, तो पाचनसंस्थेवर सौम्य प्रभाव टाकतो, पण खाण्यायोग्य कापूरच वापरावा. मात्र कापराचा अति वापर टाळावा. त्याचा अति प्रमाणात वापर केल्यास मळमळ, चक्कर, उलटी यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तो नेहमी काळजीपूर्वक आणि प्रमाणात वापरणे आवश्यक आहे.