Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! आता अहमदनगर नाही तर ‘अहिल्यानगर’ म्हणा; महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मंजूरी

राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती. गेल्या वर्षी चोंडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 04, 2024 | 06:07 PM
मोठी बातमी! आता अहमदनगर नाही तर 'अहिल्यानगर' म्हणा; महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मंजूरी

मोठी बातमी! आता अहमदनगर नाही तर 'अहिल्यानगर' म्हणा; महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मंजूरी

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर: अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’ या नावाने ओळखला जाणार आहे. राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच सरकारचे आभार देखील मानले आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता.

राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती. गेल्या वर्षी चोंडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. दरम्यान अहमदनगरचे अहिल्यानगर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे…
— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) October 4, 2024

काय म्हणाले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील? 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. विखे पाटील म्हणाले, ”अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनापासून आभार.”

रेल्वे स्थानकाचेही नाव बदलण्यात येणार

अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे देखील नाव बदलण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल घोषणा केली होती.

 

Web Title: Ahmednagar now ahilyanagar central government approve maharashtra cabinet proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • ahmednagar
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी
1

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी

Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई
2

Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Sachin Ahir News: ‘मी पक्ष सोडलेला नाही…’ सचिन अहिरांच्या विधानाने राजकीय पेच वाढला; आमदारकी राहणार की जाणार?
3

Sachin Ahir News: ‘मी पक्ष सोडलेला नाही…’ सचिन अहिरांच्या विधानाने राजकीय पेच वाढला; आमदारकी राहणार की जाणार?

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
4

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.