चित्रपट म्हटलं की, त्याच्या हिट, फ्लॉपविषयी चर्चा तर होतेच. काही चित्रपट इतके सुंदर आणि दर्जेदार असतात की कमी वेळातच ते लोकांचे मन जिंकतात आणि शेवटपर्यंत आपली छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवतात. काही चित्रपट असे असतात जे आपली कथा तितक्या मार्मिकपणे मांडण्यात अयशस्वी ठरतात आणि मग फ्लॉप होतात. आता यातही काही चित्रपट असेही असतात जे पहिल्यांनंतर आपल्याला हा चित्रपट नक्की का बनवला गेला असावा असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाविषयी माहिती सांगत आहोत ज्यात तब्बल 20 बड्या कलाकारांनी काम केलं मात्र तरीही हा चित्रपट एक मोठा फ्लॉप ठरला.
अमिताभ बच्चनचा सर्वात बकवास चित्रपट, 20 स्टार्स एकत्र येऊनही बनवू शकले नाही हिट
या चित्रपटाचे नाव 'आग' असे आहे. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने त्यावेळी रिलीज होण्यापूर्वीच खूप खळबळ उडवून दिली होती. पण रिलीज होताच एका झटक्यात सगळं उद्ध्वस्त झालं
या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले असून या आगीत एक-दोन नव्हे तर तब्बल 20 स्टार्स होते. इतक्या मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडू शकला नाही. यात अमिताभ बच्चन, सुश्मिता सेन आणि उर्मिला मॅटोंडकरसारखे अनेक ओळखीचे चेहरे आहेत
20 स्टार्स असलेल्या या चित्रपटाची कथा लोकांच्या मनाच्या पलीकडची होती. हा चित्रपट राम गोपाल वर्मा यांनी शोलेच्या धर्तीवर बनवला होता. शोले हा चित्रपट त्याने आपल्या नव्या शैलीत बनवल्याचा दावा केला जात आहे
या चित्रपटाच्या कथेत 'शोले'च्या गावाची जागा शहराने घेतली होती. दृश्यांमध्येही काही बदल करण्यात आले होते. तसेच 'शोले'मधल्या डायलॉग्सऐवजी काही वेगळे डायलॉग त्यात भरले गेले होते. अर्थातच हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांच्या काही खास पसंतीस पडला नाही
याशिवाय या चित्रपट अमिताभ बच्चन यांनी ओव्हरॲक्टिंग केल्याचेही म्हटले गेले. या चित्रपटाचे बजेट 21 कोटी होते आणि त्याने फक्त 6 कोटींचे कलेक्शन केले. MDb वर याला 1.4 रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला