यवतमाळ (Yavatmal). यवतमाळमध्ये म्युकरमाकोसिसचे रुग्ण (mucomacosis) वाढत चालले आहे. जिल्ह्यात अलीकडेच एका रुग्णाचा या आजाराने बळी घेतला (One patient has recently succumbed) आहे. कोरोनाचा कहर कायम असतानाच म्युकरमाकोसिसचे वाढते प्रमाण प्रशासनासाठी आणि मुख्यतः आरोग्य विभागासाठी (the health department,) डोेकदुखी ठरत आहे. यामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. म्युकरमायकोसिसने अलीकडचे 60 वर्षीयच वृद्धेचा मृत्यू झाला असल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. (The administration is working hard to control the disease)
[read_also content=”Corona Update/ नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली; मंगळवारी ११८९ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले https://www.navarashtra.com/latest-news/the-number-of-corona-positive-patients-decreased-in-nagpur-on-tuesday-1189-new-corona-infected-patients-were-found-nrat-130880.html”]
अधिक माहितीनुसार, १४ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय प्रशासनाने अलीकडेच त्याबाबत अधिकृत माहिती दिली. राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे दीड हजारांवर रूग्ण आढळून आले आहेत. यवतमाळातही म्युकरमायकोसिसचे ग्रामीण व शहरी भागात किमान ११ रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दुजोरा दिला. एका ६० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला तर अन्य रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एका रूग्णास उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात म्युकरमायकोसिसग्रस्त सात रुग्णांची नोंद झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी सांगितले.