फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ग्राहकांमध्ये होंडाच्या दुचाकींना नेहमीच मागणी मिळत आली आहे. जानेवारी 2026 मध्ये, होंडा अॅक्टिव्हाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या महिन्यात होंडा अॅक्टिव्हाने एकूण 2,71,924 नवीन ग्राहक मिळवले आहे . होंडा अॅक्टिव्हाची विक्री गेल्या वर्षीच्या 1,66,739 युनिट्सच्या तुलनेत वर्षानुवर्षे 63% वाढली आहे. चला जाणून घेऊयात इतर मॉडेल्सच्या विक्रीत किती वाढ झाली आहे.
जानेवारी 2026 मध्ये होंडा शाइन 125 विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे, या बाईकचे 1,35,076 युनिट्स विकले गेले, जी वर्षानुवर्षे 11 टक्क्यांनी घसरली. ह्युंदाई सीबी युनिकॉर्न 160 विक्रीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाईकचे 35,710 युनिट्सची विक्री झाली. होंडा शाइन विक्रीत चौथ्या क्रमांकावर राहिले जिचे 26,148 युनिट्स विकले गेले.
होंडाच्या विक्री यादीत Honda CB Hornet 125 ला सुमारे 9 हजार ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या कालावधीत या मॉडेलच्या एकूण 8,752 युनिट्सची विक्री झाली.
विक्रीच्या यादीत पाचव्या क्रमांकावर Honda Dio राहिला. Dio च्या विक्रीत वार्षिक 44 टक्क्यांची घट नोंदवली गेली असून एकूण 13,855 युनिट्सची विक्री झाली. सहाव्या क्रमांकावर Honda Dio 125 राहिला, ज्याच्या 11,607 युनिट्सची विक्री झाली.
‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
आठव्या क्रमांकावर Honda CB350 होती. या मॉडेलने तब्बल 224 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवत 5,500 युनिट्सची विक्री केली.
नवव्या क्रमांकावर Honda Livo राहिली. तिच्या विक्रीत 9 टक्क्यांची वार्षिक घट झाली असून 4,433 युनिट्सची विक्री झाली.
दहाव्या क्रमांकावर Honda SP 160 राहिली. या बाईकच्या विक्रीत 51 टक्क्यांची वार्षिक घट नोंदवली गेली असून एकूण 2,474 युनिट्सची विक्री झाली.
दरम्यान, Honda Activa e या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा संथ प्रतिसाद मिळाला असून या जानेवारी 2026 मध्ये केवळ 224 नवीन ग्राहकांनी ही स्कूटर खरेदी केली आहे.






