'चीनने जगाला फसवले!' गलवान हिंसेच्या ७ दिवसातच 'यील्ड प्रोड्युसिंग' चाचणी केल्याचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
China secret nuclear test June 2020 Galwan : जगाला कोरोनाच्या संकटात ढकलून चीन शांत बसला नव्हता, तर पडद्यामागे अण्वस्त्रांची मोठी तयारी करत होता, असा खळबळजनक दावा आता अमेरिकेने केला आहे. १५ जून २०२० रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी (Galwan) आणि भारतीय सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला, ज्यात भारताचे २० वीर जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण जग हादरले असताना, चिनी लष्कराने याच्या अवघ्या एका आठवड्यानंतर म्हणजेच २२ जून २०२० रोजी एक गुप्त अणुचाचणी (Secret Nuclear Test) केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आयोजित ‘निःशस्त्रीकरण परिषदेत’ (Disarmament Conference) अमेरिकेचे शस्त्र नियंत्रण उप-सचिव थॉमस डीनानो यांनी हा धक्कादायक अहवाल सादर केला. डीनानो म्हणाले की, “अमेरिकन सरकारला पूर्ण खात्री आहे की चीनने प्रतिबंधित करारांचे उल्लंघन करून ही चाचणी केली. चिनी लष्कराने (PLA) हे स्फोट जाणीवपूर्वक जगापासून लपवले कारण त्यांना माहिती होते की हे आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले
अणुस्फोट केल्यावर जमिनीखाली प्रचंड कंपनं निर्माण होतात, जी जगातील भूकंपमापन यंत्रांवर (Seismic Monitors) नोंदवली जातात. मात्र, चीनने ही कंपनं दडपण्यासाठी ‘डीकपलिंग’ (Decoupling) या प्रगत तंत्राचा वापर केला. यात एका मोठ्या पोकळ गुहेत स्फोट केला जातो, ज्यामुळे कंपनांची तीव्रता कमी होते आणि बाहेरील यंत्रणांना हा अणुस्फोट वाटण्याऐवजी किरकोळ भूकंप वाटतो. अशा प्रकारे चीनने जगाच्या डोळ्यांत धूळ फेकून आपली अण्वस्त्र क्षमता वाढवल्याचा अमेरिकेचा दावा आहे.
US under secretary informed the World that China conducted Nuclear Tests on June 22, 2020 with yields in hundreds of tons. This was the same time as India was fighting with China on Galwan! 👀👀 pic.twitter.com/6G3QlrwGag — Rohit Sharma 🇺🇸🇮🇳 (@DcWalaDesi) February 6, 2026
credit – social media and Twitter
हा गौप्यस्फोट अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिका आणि रशियामधील ‘न्यू स्टार्ट’ (New START) करार संपला आहे. २०१० मध्ये ओबामा आणि मेदवेदेव यांनी केलेल्या या करारानुसार अण्वस्त्रांच्या संख्येवर मर्यादा होत्या. पण आता अमेरिकेचे म्हणणे आहे की, चीन ज्या वेगाने अण्वस्त्रे वाढवत आहे (२०३० पर्यंत १,००० वारहेड्स), ते पाहता रशियासोबतच्या द्विपक्षीय कराराला काही अर्थ उरलेला नाही. चीनलाही या करारात ओढण्यासाठी ट्रम्प प्रशासन आता आक्रमक झाले आहे.
चीनने अमेरिकेचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. चीनचे राजदूत शेन जियान यांनी सांगितले की, चीन नेहमीच अण्वस्त्रांच्या बाबतीत जबाबदार राहिला आहे. “अमेरिका खोटा प्रचार करून चीनला धोकादायक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षात अमेरिका आणि रशियाकडे प्रत्येकी ४,००० अण्वस्त्रे आहेत, तर चीनकडे केवळ ६०० च्या आसपास आहेत. त्यामुळे शस्त्रास्त्रांच्या शर्यतीसाठी अमेरिकाच जबाबदार आहे,” असे चीनने म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पत्रकारितेच्या इतिहासातील ‘ब्लॅक वेनस्डे’! 300 पत्रकारांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर CEOचा राजीनामा; Washington Postमध्ये धुमाकूळ
गलवान संघर्षानंतर लगेचच चीनने अणुचाचणी करणे, हे भारतासाठी अत्यंत चिंतेचे आहे. जर चीन आपल्या अण्वस्त्रांचा विस्तार करत असेल आणि तेही अशा गुप्त पद्धतीने, तर दक्षिण आशियातील शक्ती संतुलन बिघडू शकते. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांना आता आपली संरक्षण रणनीती अधिक सतर्क ठेवावी लागणार आहे.
Ans: अमेरिकेच्या दाव्यानुसार, चीनने २२ जून २०२० रोजी आपल्या 'लोप नुर' (Lop Nur) या गुप्त तळावर अणुचाचणी केली.
Ans: हा अमेरिका आणि रशियामधील एक करार होता, ज्याअंतर्गत दोन्ही देशांनी आपल्या अण्वस्त्रांची संख्या १,५५० पर्यंत मर्यादित ठेवण्याचे मान्य केले होते. जो ५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपला आहे.
Ans: चीनच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे सुमारे ६०० अण्वस्त्रे आहेत, तर अमेरिकेचा अंदाज आहे की २०३० पर्यंत हा आकडा १,००० च्या पुढे जाईल.






