मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठमोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारही अॅक्शन मोडवर आले आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पुणे आणि मुंबईसाठी केंद्र सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो आणि ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोच्या प्रकल्पाला मंजूर देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यासाठी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात केंद्रीय मंत्रिमंडळाने कोकणातील वाढवण बंदरासाठी 76 हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या 5.46 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पालाही मंजूर देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2,954.53 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तर 2029 पर्यंत हा मेट्रोमार्ग कार्यान्वित होईल.
हेदेखील वाचा : कानपूरमध्ये रेल्वे अपघात; वाराणसीहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यासाठी जवळपास 12,200 कोटींचा निधी लागणार आहे. जवळपास 29 किमी लांबीच्या या प्रकल्पात 26 किमीचा मार्ग हा एलिव्हेटेड असेल तर 3 किमीचा मार्ह अंडरग्राऊंड आमि यात 22 थांबे असतील. हा मेट्रो मार्ग नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत इत्यादी प्रमुख भागांना जोडणारा असेल.
हेदेखील वाचा: ओल्या खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर इडलीसोबत बनवा मदुराई स्पेशल थन्नी चटणी
या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच, अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतुकोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकेल असेही त्यांनी म्हटले आहे.