फोटो सौजन्य : सोशल मीडिया
कानपूर : कानपूरमध्ये शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास रेल्वे अपघात झाला. साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले. भीमसेन विभागातील गोविंदपुरी स्थानकाजवळ हा अपघात झाला. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शनी बोल्डर इंजिनवर आदळले आणि इंजिनचा कॅटल गार्ड वाकला आणि खराब झाला.
कानपूरमधील गोविंदपुरी स्थानकाजवळ 19168 साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. सध्या कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बोल्डर आदळल्याने हा अपघात झाल्याचे उत्तर मध्य रेल्वेने सांगितले. अपघातामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कानपूरहून बुंदेलखंड मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.
कानपुर के गोविंदपुरी स्टेशन के पास 19168 साबरमती एक्सप्रेस के 22 कोच पटरी से उतरे। DM राकेश कुमार सिंह ने बताया pic.twitter.com/qPkEptHsQC
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) August 17, 2024
कानपूरचे डीएम राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, जवळपास 22 डबे रुळावरून घसरले आहेत. ते आणि एसडीएम घटनास्थळी हजर आहेत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही लोकांना किरकोळ ओरखडे पडले आहेत. कोणीही गंभीर जखमी झाले नाही. प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी किंवा रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उभ्या असून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
हायलाईट्स
हे देखील वाचा : भारताने बनवलेले कामिकाझे ड्रोन; रशिया आणि युक्रेनमधील युद्धातही याचा वापर मोठ्या प्रमाणावर
दरम्यान घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळावरून प्रवाशांना विशेष ट्रेनने कानपूर सेंट्रलला पाठवले जात आहे. येथून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवले जाईल. रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत:
लोको पायलट के अनुसार, प्रथम दृष्टया ऐसा प्रतीत होता है कि बोल्डर इंजन से टकराया था, जिसके कारण इंजन का कैटल गार्ड बुरी तरह क्षतिग्रस्त/मुड़ा हुआ था।
भारतीय रेलवे ने आपातकालीन हेल्पलाइन नंबर जारी किए हैं:
(सोर्स- भारतीय रेलवे) pic.twitter.com/bQR3b9nvO1
— NBT Hindi News (@NavbharatTimes) August 17, 2024
प्रयागराज 0532-2408128, 0532-2407353
कानपुर 0512-2323018, 0512-2323015
मिर्जापुर 054422200097
इटावा 7525001249
टुंडला 7392959702
अहमदाबाद 07922113977
बनारस सिटी 8303994411
गोरखपुर 0551-2208088