मदुराई स्पेशल थन्नी चटणी
रविवारच्या दिवशी किंवा इतर वेळी नाश्त्यासाठी मेदुवडा किंवा इडली, डोसा बनवला जातो. इडली किंवा डोसा बनवल्यानंतर त्याच्यासोबत सांबर आणि ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली जाते. इडली चटणी हा पदार्थ दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बनवला जातो.सतत इडली किंवा डोसासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला ओल्या खोबऱ्याचा वापर न करता थन्नी चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दक्षिण भारतामध्ये थन्नी चटणी हा पदार्थ ओल्या खोबऱ्याचा वापर न करता बनवला जातो. तमिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील तिखट गोड चटणी तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला तर जाणून घेऊया थन्नी चटणी बनवायची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कमी वेळात बनणारा टेस्टी नाश्ता; ब्रेड आणि पनीरची परफेक्ट डिश