बिहार: रणजी ट्रॉफीमध्ये बिहारचा २२ वर्षीय फलंदाज साकीबुल गानीने पहिल्याच सामन्यात त्रिशतक झळकावले आहे. संपूर्ण जगात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्रिशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यासह तो रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. साकिबुल गानीने ३८७ चेंडूत ५० चौकार मारत त्रिशतक पूर्ण केले. मिझोरामविरुद्ध त्याने हा पराक्रम केला आहे.
यापूर्वी हा विक्रम मध्य प्रदेशचा फलंदाज अजय रोहेराच्या नावावर होता. २०१८-१९च्या रणजी मोसमात हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हे आश्चर्यकारक केले. त्याने २६७ धावा केल्या होत्या.