Photo Credit- Social Media
मुंबई: बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांनी आणि समोर आलेल्या व्हिडिओंमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनांचा मोठा राजकीय परिणाम दिसून येत असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा तापला आहे. या प्रकरणामुळे बीडमध्ये फोफावलेली गुन्हेगारीही उघडकीस आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील अनेक धागेदोरे वेळोवेळी समोर आणले. हे प्रकरण ताजे असतानाच काल त्यांनी पुन्हा काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. यात सरपंच संतोष यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी घेणारे न्यायाधीश आणि याच प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी धुळवड साजरी करताना दिसत आहे.
कालच्या या व्हिडीओनंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा बीड प्रकरणावर भाष्य केलं आहे. “बीडमधला प्रत्येक अधिकारी बदलला पाहिजे. जर हे होत नसेल तर या राजकीय पक्षांवरच बहिष्कार टाका. सर्वांची भेट घेऊनही कोणीच काही कारवाई केली नाही. आता हे थांबल पाहिजे. आता बीड जिल्ह्यात जो पोलीस विभाग आहे. त्यातला प्रत्येकाला उचलून बाहेर काढला पाहिजे, त्याची बदली केली पाहिजे आणि त्याच्या जागी नवे अधिकारी नियुक्त केले पाहिजे. आता जातीपातीच्या वादात पडू नये, तिथली प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे.”
NASA Breaking : ‘…अखेर ती परतणार’! एलॉन मस्कच्या स्पेसएक्सचे अंतराळयान ISS वर दाखल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमधील घटनांवर भाष्य करत प्रतिक्रीया दिली. “काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले काही महिने बीडमध्ये दिसत आहेत.” त्यानंतर शरद पवार यांच्या या वक्तव्यावर अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. बीड प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेल्या दमानिया यांनी “शरद पवारांनी आधीच नेत्यांच्या चुका दाखवून दिल्या असत्या आणि वेळीच कठोर पावले उचलली असती, तर आज ही परिस्थिती ओढवली नसती,” असा घणाघाती आरोप केला आहे. त्याचबरोबर, “हे सर्व थांबवले पाहिजे, आणि शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावे,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दमानिया यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
बीड पोलिसांच्या नेमप्लेट निर्णयावर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया म्हणाल्या, “तिथे सगळ्यांना एकमेकांची जात माहिती आहे. त्यामुळे आपण आता जातीपातीच्या मुद्द्यात न अडकता मुळात प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. आत्तापर्यंत समोर आलेली सर्व प्रकरणे ही विविध जातींच्या लोकांशी संबंधित आहेत. प्रत्येक जातीतील लोकांनीच इतर जातीतील लोकांवर अत्याचार केले आहेत. त्यामुळे येथे जात नाही, तर मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.दमानिया यांच्या या वक्तव्यामुळे बीड प्रकरणाच्या सामाजिक आणि राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
Jayant Patil News: जयंत पाटील शिवसेनेत जाणार..? बड्या नेत्याच्या विधानाने बदलणार राजकीय समीकरणे