धनंजय मुंडे यांनी कामाची मागणी केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी टोला लगावला आहे (फोटो -सोशल मीडिया)
Dhananjay Munde : मराठवाडा : अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे जोरदार चर्चेमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांनी भर मंचावरुन थेट कामाची मागणी केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी केली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये झाली. मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसोबत असलेल्या संबंधांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांनी कामाची मागणी केल्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांचे हात रिकामे आहेत, त्यांना रोजगार हमीचं काम द्या, त्यांना बराशी खोदायला पाठवा असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांना डिवचले आहे. तसेच मराठ्यांच्या नादाला लागू नका, अन्यथा अजितदादांना पण सोडणार नाही, त्यांचाही कार्यक्रम लावणार असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे कामाची मागणी केली. यावेळी छगन भुजबळ यांनी लगेचच उत्तर देत ओबीसी लढ्यामध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. यावरुन देखील मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी टीकास्त्र डागले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, ते सर्वांना आसेच कामाला लावतात, मग अलीबाबाला खेळायला मैदान मोकळं राहातं, ते लोकांकडून फुकटात काम करून घेतात, असा टोला मराठा नेते जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर सामाजिक नेत्या अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, या माणसाला मंत्रिमंडळामध्ये पुन्हा संधी देऊ नका. तसेच जनतेच्याही कोणत्याही पदावर त्याला घेऊ नका. हवं असेल तर त्यांना पक्षांतर काम करण्याची संधी द्या, पण त्यांना मंत्री करुन कामाची संधी देऊ नका. असे स्पष्ट मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.