नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी आणि विलास भोईर हेही उपस्थित होते. या घडामोडींमुळे नवी मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.