NASA Breaking : ...अखेर ती परतणार; एलॉन मस्क स्पेसएक्सचे अंतराळयान ISS वर दाखल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एक आनंदाची बातमी आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे फाल्कन-9 रॉकेट प्रक्षेपणाच्या 28 तासानंतर अंतराळ स्थानकात पोहोचले आहे. 9 महिन्यांपासून अंतराळस्थानकात अडकलेल्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी हे रॉकेट यशस्वीरित्या अवकाश स्थानकात पोहोचले आहे. भारतीय वेळेनुसार, आजा 16 मार्च 2025 रोजी सकाळी 9.40 वाजता स्पेसएक्सचे रॉकेट पोहोचले.
#WATCH | Stranded for 9 months at International Space Station (ISS), astronauts Butch Wilmore and Sunita Williams to return to earth
A SpaceX rocket carrying a new crew has docked at the International Space Station (ISS) as part of a plan to bring astronauts home. The astronauts… pic.twitter.com/rb38BeCEQ6
— ANI (@ANI) March 16, 2025
चार सदस्यांची टीम अंतराळ स्थानकात
या फाल्कन रॉकेटमध्ये चार सदस्यांची क्रू-10 टीममध्ये नासाचे अंतराळवीर ॲनी मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स, जपानचे ताकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. या अतंराळवीरांनी शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता स्पेसएक्सच्या फाल्कन-9 ने उड्डाण केले होते. फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरमधून याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
19 मार्चनंतर पृथ्वीवर रवाना होणार
क्रू-10 अंतराळस्थानकात पोहोचले असून 19 मार्चनंतर क्रू-9 चे अंतराळवीर नासाचे निक हेग, सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह ड्रॅगन अंतराळयानातून पृथ्वीवर परत येण्यास रवाना होतील.
ISS वर 280 दिवसांपासून अडकलेले होते अंतराळवीर
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमधून ISS वर गेले होते. त्यांचा हा प्रवास फक्त 8 दिवसांचा होता. मात्र, बोईंगच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रवास लांबला. स्टारलाईनरमध्ये हायड्रोजन गळती आणि थ्रस्टरच्या बिघडामुळे दोन्ही अंतराळवीरांना परत येण्यास विलंब झाला. नंतर सप्टेंबर 2024 मध्ये स्टारलाईनर रिकामे अवस्थेत पृथ्वीवर परत पाठवण्यात आले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ISS वरच राहिले.
एलॉन मस्क यांच्यावर अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांच्यावर सोपवली होती. ही जबाबदारी एलॉन मस्क यांनी पार पाडली आहे. आता सुनिता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर सुरक्षित परतण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.
बायडेन प्रशासनावर टीका
ट्रम्प यांनी सुनिता विल्यम्सच्या परत येण्याच्या विलंबसाठी जो बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले होते. ट्रम्प यांनी म्हटले होते की, “मी मस्कला दोन्ही शूर अंतराळवीरांना परत आणण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी जो बायडेन यांच्यावर टीका करत, बायडेन प्रशासनाने त्यांना अंतराळातच सोडले असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या परत येण्यास विलंब होणार नाही अशी हामी देखील ट्रम्प यांनी दिली होती.