आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऊसाच्या दरासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. विलासराव देशमुखांनी स्थापन केलेल्या मांजरा सहकारी साखर कारखान्याने ३१५० रुपये दर जाहीर केला असून, तो आजही देशमुख परिवाराच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत जर अशोक चव्हाण यांनी खरंच देशमुखांना दाबायचे असेल, तर त्यांनी ३१५० रुपयांपेक्षा जास्त भाव जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करावी, अशी मागणी चिखलीकरांनी केली. यासोबतच जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अधिक प्रमाणात देण्याचीही त्यांनी शासनाकडे मागणी केली.
.