सुतारवाडी – कोरोनाने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण केले असून रोहा तालुक्यातही कोरोना पॉझिटिव्ह संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सुतारवाडी येथे ३१ वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने दशक्रोशिमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तरुणाला किल्ला धाटाव याठिकाणी क्वॉरंटाईन केले असून तो राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे.
सुतारवाडी दशक्रोशिमध्ये १६ वाड्यांचा समावेश आहे. या वाड्यांमध्ये मार्च ते जुलैच्या २० तारखेपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नव्हता. मात्र २१ जुलै रोजी सुतारवाडी येथे सापडलेल्या एका ३१ वयाच्या पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाल्यानंतर दशक्रोशिमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही व्यक्ती आता कोणा कोणाच्या संपर्कात आली होती याचा शोध सध्या सुरू आहे. सुतारवाडी मध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णा मुळे दशक्रोशिमध्ये खळबळ माजली आहे.
ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मार्च महिन्यापासून एकही कोरणा पॉझिटिव्ह सापडला नव्हता. ग्रामपंचायतीने नागरिकांना दक्षता घेण्याचे वेळोवेळी आवाहन केले होते. मात्र २१ जुलैला सुतारवाडीत एक पुरुष पॉझिटिव्ह सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.