नवी दिल्ली- सर्वच देशांत वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या पंरपरांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. काही देशांत तर हा दिवस धरुन लग्न करण्याचीही प्रथा आहे. तर जगात असे काही मुस्लीम देशही आहेत, की जिथे व्हलेंटाईन डे साजरा करण्यास मनाई आहे. सौदी अरबही याच देशांतील एक देश होता. सौदी अरब सारखअया परंपरा मानणाऱ्या देशात व्हलेंटाईन डेला हराम म्हणजेच धर्माच्या विरोधात मानण्यात येत होते. जर त्यातही कुणी हा दिवस साजरा केला तर त्याला शिक्षेची आणि दंडाचीही तरतूद होती.
आता यावेळी मात्र २०१८ नंतर पहिल्यांदा सौदी अरबमध्येही व्हॅलेटाईन डे साजरा करण्यात येणार आहे. या देशातील प्रमुख धार्मिक विद्वान शेख अहमद कासिम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रमेचा उत्सव असल्याचे कासीम यांनी म्हटले आहे. त्यामुळे सौदी अरबमध्ये बुरख्यात राहणाऱ्या महिला, व्हँलेंटीन डेच्या खरेदीसाठी रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या दुकानांत, शॉपिंग मॉल्समध्ये आपल्या प्रियकरांसाठी, प्रियजनांसाठी भेटवस्तू घेताना दिसत आहेत.
सौदी अरबमध्ये पांरपारिक प्रथांना बाजूला ठेवत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा निर्णय घेतला जात असताना आपल्या देशात मात्र एकदम विरुद्ध स्थितीचे आंदोलन पाहायला मिळते आहे. हिजाबसाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थिनी आंदोलनात उतरल्या आहेत. तर त्याला प्रत्युत्तरासाठी भगव्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो आहे. २१ व्या शतकात प्रगतीच्या वाटेवर सौदी अरब जात असताना, आपल्या देशातील ही स्थिती खंत वाटणारी आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.






