अटक करण्यात आलेले आरोपी
अकोला (Akola). पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने डाबकी रोड पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या भगतवाडी परिसरात नजीरभाई घासलेटवाले यांच्या घरात चालणा-या जुगार अड्ड्यावर छापा मारुन 5 आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 1730 रुपये, 9 हजार रूपये किमतीचे 3 मोबाइल असा 10730 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींमध्ये शेख इमरान शेख फारुख, अब्दुल वहीद अब्दुल सईद, शेख सोहिल शेख कयूम उद्दीन, मो. इमरान मो.शफी, मुजाहिद खान मतीनखान सर्व रा. भगतवाडीतील रहिवासी आहेत.






