गोंदिया : धान खरेदी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे चुकीचे क्रमांक दिल्याने धान विक्रीचे ९ कोटी रुपयाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. खात्यांमध्ये त्रुटी असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आलेली चुकाऱ्याचे रक्कम पुन्हा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खात्यात वळती झाली. विशेष म्हणजे, ज्यांच्या खात्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या, अशा शेतकऱ्यांचे खाते क्रमांक पुन्हा मागविण्यात आले. या प्रक्रियेला एक महिना लोटला असताना अद्याप या शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाच्या चुकाऱ्याची दमडीही आलेली नाही. केंद्रचालकांची चूक आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची संथगती यामध्ये शेतकरी अडकला असून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी चुकारे अडलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
[read_also content=”नागपुरात उभारला जाणार देशातील सर्वात मोठा इनोव्हेशन आणि रिसर्च पार्क, आयआयएम नागपूरचा बहुउद्धेशीय प्रकल्प https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/the-largest-innovation-and-research-park-in-the-country-to-be-set-up-at-nagpur-iim-nagpur-multipurpose-project-nraa-255335.html”]
शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व अदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या मध्यमातून धान खरेदी करण्यात येते. त्यातच आता शेतकऱ्यांनी धानाच्या चुकाऱ्याची रक्कम आपल्या बॅंक खात्यात जमा व्हावी, यासाठी धान खरेदी केंद्रांवर आपले बँक खाते क्रमांक नोंदविले होते. मात्र, संबंधित केंद्र चालकांकडून या शेतकऱ्यांचे जुनेच व एकापेक्षा अधिक खातेदार असलेले बँकेचे क्रमांक जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे पाठविण्यात आले. परिणामी शासनाकडून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टाकण्यात आलेली चुकाऱ्याची रक्कम परत जिल्हा मार्केटिंगच्या खात्यावर वळती झाली. विशेष म्हणजे, चुकाऱ्याची रक्कम तब्बल ९ कोटी रुपये असून अनेक शेतकरी शासनाकडून पैसा येऊनही आपल्या हक्काच्या पैशांपासून मुकले आहे.
[read_also content=”तीन आरोपींनी खोलीतील सीसीटीव्ही बंद करून अंधारात सोडविल्या उत्तरपत्रिका https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/teacher-eligibility-test-case-answer-sheets-of-three-accused-in-the-dark-by-turning-off-the-cctv-in-the-room-nraa-255245.html”]
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनही थकलेले
ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक देताना चुका केल्या आहेत. अशा शेतकऱ्यांनी योग्य खाते क्रमांक पुन्हा अपलोड करता यावा, यासाठी सरकारने वेबसाइट उघडली आहे. केंद्रचालकांनी पुन्हा नव्या खात्यांचे क्रमांक ऑनलाइनद्वारे वेबसाइटवर अपलोड केले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिना लागला. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर धान विक्रीची रक्कम जमा न झाल्याने केंद्रचालकांची चूक झाली असली तरी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनही थकलेले असल्याचे चित्र आहे. फेडरेशनची संथगतीच्या जाळ्यात शेतकरी पुरते अडकले आहेत.