नांदगाव खंडेश्वर नगरपरिषद निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढत आहे. हाऊ घातलेल्या या निवडणुकीत, प्राप्ती मारोटकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.निवडणुकीच्या धामधूमीत प्राप्ती मारोटकर यांचा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्थानिक कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची जोरदार उपस्थिती यावेळी दिसून आली. प्राप्ती मारोटकर यांनी सांगितले की, नांदगाव खंडेश्वर शहराचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे प्राधान्य असणार आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यापासून स्वच्छता, पाणीपुरवठा आणि महिला सक्षमीकरण यासारख्या योजनांवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.तसेच युवकांसाठी रोजगारनिर्मिती, शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण आणि शैक्षणिक सुविधा वाढविणे या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर देण्याचे आश्वासन दिले आहे.निवडणूक जवळ येत असताना, प्राप्ती मारोटकर यांचे हे विकासाचे दृष्टीकोन नागरिकांपर्यंत कितपत पोहोचतात आणि मतदारांचा प्रतिसाद काय असतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.