वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गादी उत्पादन कंपनीला आज अचानक भीषण आग लागली. आगीच्या पहिल्या झटक्यातच कारखान्यात काम करणारे दोन कामगार जखमी झाले असून त्यांना बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कारखान्यात गादी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फोम साठवलेला असल्याने आग काही क्षणांतच भडकली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र फोम व इतर ज्वलनशील पदार्थांमुळे आग नियंत्रणात आणणे कठीण ठरत आहे.