Wardha Election Many Congress Candidates Do Not Have Ab Form Due To Internal Differences
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही
वर्धेच्या आर्वीत नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी वेळ संपुनही इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म न मिळाल्यामुळे इच्छुक असलेल्या त्या 25 उमेदवारांचे अर्ज बाद होणार आहेत.
वर्धेच्या आर्वीत नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी वेळ संपुनही इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म न मिळाल्यामुळे इच्छुक असलेल्या त्या 25 उमेदवारांचे अर्ज बाद होणार आहेत.याचे खापर मात्र काँग्रेसचे नेते एकमेकांवर फोडताना दिसत आहे.एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला वर्धा जिल्हा आज काँग्रेस मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.अजूनही काँग्रेसचे नेते मानायला तयार नसल्याचे चित्र पुन्हा एकदा नगरपरिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आर्वी मध्ये पाहायला मिळाले.एकंदरीत काँग्रेसमध्ये असलेला समनव्ययाचा अभाव आपसांत असलेले अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेय.काँग्रेसचे शैलेश अग्रवाल व अनंत मोहोड यांनी नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा अग्रवाल, प्रनोती जयसिंगपूरे व अनुराधा भुयार यांची नावे वरिष्ठांना दिली होती पण ऐन वेळेवर नगराध्यक्ष पदाचा अर्ज अंजली जगताप यांनी दाखल केल्याने काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आपल्याच पक्षातील काहींवर गंभीर आरोप केले आहेत.त्यावर प्रतिउत्तर देतांना चुकीचे काही झाले असेल तर त्यांनी पोलीस तक्रार करावी असे खासदार अमर काळे यांनी बोलून दाखवले आहे.
Follow Us:

Web Title: Wardha election many congress candidates do not have ab form due to internal differences