राधनपूर- गुजरातच्या धुंधका शहरात धरवाड समाजाच्या तरुणाची हत्येनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत आणखी भर पडली आहे. या परिसरातील राधनपूर येथे एका हिंदू परिवारात, दुपारी घरात घुसून एका मुस्लीम तरुणाने, एका मुलीवर चाकू हल्ला केला आहे. या मुलीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर शनिवारी तिला शहरातील दुसऱ्या ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ शहरात हिंदू संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. चौधरी, धारवाड आणि ठआकोर समाजाचे १५ हजार नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली होती. या नागरिकांनी दोन्ही घटनांचा जोरदार निषेध केला. तणावाची परिस्थिती लक्षात घेता राधोनपूर परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
मोर्चाला परवानगी मिळण्यापूर्वीच हजारो नागरिक एकत्र
या दोन्ही घटांनाचा विरोध करण्यासाठी आज शहरात मोर्चा काढण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र त्यापूर्वीच १५ हजार नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी विरोधी आंदोलन केले.
काय आहेत दोन्ही प्रकरणे
२५ जानेवारीला धुंधका शहरात राहणाऱ्या किशन भारवाड यांची मुस्लीम कट्टरपंथियांनी गोळी मारुन हत्या केली. किशनने टाकलेल्या एका पोस्टवर हे कट्टरपंथी नाराज होते. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात अहमदाबादेतून एका मौलवीसह तीन जणांना अटक केली आहे. तर आता राधनपूर तालुक्यात शेरगढ गावात एका मुलीवर यासीन मजीशा बलोच नावाच्या तरुणाने चाकू हल्ला केला. यावेळी कुटुंबातील सर्व पुरुष कामासाठी शेतावर गेले होते. या मुलीच्या आरडोरड्यामुळे शेजारच्या लोकांनी यासीनला पकडले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर यासिनला पोलिसांनी अटक केली. ही बातमी पसरल्यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
[read_also content=”भैय्यूजी महाराजांच्या बंद खोलीतील आत्महत्येचे गूढ, १२ महिलांशी होते संबंध, २ महिला आय़एएस, एका फोनच्या कॉलमुळे उघडकीला आला कट https://www.navarashtra.com/india/mystery-of-bhayyuji-maharajs-suicide-in-closed-room-relationship-with-12-women2-women-iascut-revealed-due-to-a-phone-call-nrvb-229477.html”]