लखनौ (Lucknow). रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. बसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
[read_also content=”राम मंदिर निर्माणकार्य ! दीडपट दानराशी आवश्यकतेपेक्षा जास्त पटीने गोळा; खर्च १५०० कोटीचा, ४४ दिवसांमध्ये २१०० रुपयांचे दान गोळा https://www.navarashtra.com/latest-news/ram-temple-construction-work-collect-half-of-the-required-donations-cost-rs-1500-crore-collect-donations-of-rs-2100-in-44-days-nrat-95650.html”]
भीमशक्तीला एकत्र करण्यासाठी आठवलेंनी या दोन नेत्यांना सोबत येण्याचं निमंत्रण तर दिलेच, यासह त्यांनी मायावती याना रिपाइं चे अध्यक्ष पद देऊ असं देखील घोषित केलं आहे. ‘जर मायावती या रिपब्लिकन पक्षात आल्या तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून मी स्वतः उपाध्यक्ष होईल,’ असं भाष्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
ते लखनौच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज लखनौ येथे आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांची भेट घेतली. लखनौ येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यास रामदास आठवले यांनी संबोधित केले. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच या वेळी विधान सभा निहाय पक्ष प्रभारींची नियुक्ती रामदास आठवले यांनी केली.