फोटो सौजन्य: @91wheels/X.com
भारतात एक काळ होता जेव्हा बाईक खरेदी करताना फक्त त्याच्या मायलेज आणि किमतीकडे जास्त लक्ष दिले जायचे. मात्र, जसजसा काळ बदलत गेला तशा ग्राहकांच्या आपल्या बाईककडून असणाऱ्या अपेक्षा बदलत गेल्या. आजचा ग्राहक बजेट फ्रेंडली किमतीत दमदार लूक आणि परफॉर्मन्स देणारी बाईक हवी आहे. इथेच TVS ने त्यांची Raider बाईक ऑफर केली आणि मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. आता नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये या बाईकचा नवा एडिशन लाँच केला आहे.
TVS ने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय बाईक रेडर 125 चे सुपर स्क्वॉड एडिशन लाँच केले आहे. कंपनीने Marvel सिनेमाच्या लोकप्रिय सुपरहिरो Deadpool आणि Wolverine पासून प्रेरित नवीन कलर व्हेरिएंट आणले आहेत. यापूर्वी, सुपर स्क्वॉड एडिशन अंतर्गत Black Panther आणि Iron Man सारख्या मार्वल सिनेमाच्या पात्रांपासून प्रेरित होऊन ही बाईक सादर करण्यात आली होती.
फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर खरेदी करा Nissan Magnite SUV चा CNG व्हेरिएंट, एवढाच असेल EMI?
टीव्हीएस रेडरच्या सुपर स्क्वॉड एडिशनची एक्स-शोरूम किंमत 99,465 रुपये आहे. चला या नवीन बाईकच्या एडिशनबद्दल जाणून घेऊयात,
या एडिशनमध्ये बाईकवर Deadpool आणि Wolverine थीमचे खास ग्राफिक्स आणि डेकल्स दिले गेले आहेत. याचा बेस कलर ग्रे आणि ब्लॅक आहे. Marvel सिनेमाच्या चाहत्यांना हे ग्राफिक्स नक्कीच आवडतील.
बाईकच्या फ्युएल टँकवर Deadpool आणि Wolverine चे मास्क ग्राफिक्स आकर्षक दिसतात. याचप्रमाणे Black Panther आणि Iron Man कलरमध्येही खास ग्राफिक्स उपलब्ध आहेत. हे डिझाइन्स बाईकला एक वेगळं आणि स्टायलिश लूक देतात.
रेडर 125 च्या या सुपर स्क्वॉड एडिशनमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. आता त्यात iGO असिस्ट टेक्नॉलॉजी स्टॅंडर्ड म्हणून आहे. हे एक माईल्ड-हायब्रिड फीचर आहे, ज्यामध्ये बाईकला लवकर सुरू होण्यासाठी इलेक्ट्रिक असिस्ट मिळतो. यामुळे इंजिनवरील भार कमी होतो, ज्यामुळे बाइकचा पिकअप सुधारतो आणि अधिक मायलेज देखील मिळतो.
यासोबतच, TVS Raider मध्ये कमी-rpm असिस्ट देखील देण्यात आला आहे. हे फिचर रायडरला थ्रॉटल न देता फक्त क्लच वापरून मंद गतीने बाईक चालवण्याची परवानगी देते, ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये सायकल चालवणे खूप सोपे होते. ही फीचर्स पूर्वी टॉप-स्पेक SX, iGo आणि स्प्लिट सीट व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होती.
याशिवाय, या बाईकमध्ये एलसीडी कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, फोन अलर्ट, व्हॉइस असिस्ट यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत. रायडरच्या सुरक्षिततेसाठी साइड-स्टँड डाउन इंजिन कट-ऑफ सेन्सर आणि एसबीटी म्हणजेच एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देखील प्रदान करण्यात आली आहे.
टीव्हीएसने 2023 मध्ये ब्लॅक पँथर आणि आयर्न मॅन व्हेरियंटसह मार्वल थीम असलेली रेडर एसएसई पहिल्यांदा सादर केली आहे. कंपनी टीव्हीएस एनटॉर्क 125 स्कूटरसह हे व्हेरिएंट देत आहे. अलीकडेच, एनटॉर्क 125 स्कूटरचा अपडेटेड कॅप्टन अमेरिका थीम असलेली व्हेरिएंट देखील लाँच करण्यात आला आहे. मार्वल सिनेमाचे चाहते असलेल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने मार्वलसोबत ही पार्टनरशिप केली आहे.