भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासाठी भारतीय संघाने आपला संघ देखील आधीच जाही केला आहे. संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळवला जात आहे. भारतीय संघ 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ 4 सप्टेंबरला यूएईला रवाना होणार आहे. मात्र आशिया कपपूर्वी भारतासाठी नामुष्की ठरणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयच्या अपयशामुळे भारतीय संघाला आशिया कप स्पर्धेत जर्सी स्पॉन्सरशिवाय उतरावं मैदानावर उतराव लागणार असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयला आशिया कप स्पर्धेसाठी जर्सी स्पॉन्सर शोधण्यात अपयशी ठरली आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 : Danish Malewar ने इतिहास रचला! ‘असे’ करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
बीसीसीआय क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. तसेच बीसीसीआयचा क्रिकेट जगतात चांगलाच दबदबा आहे. मात्र बीसीसीआयला अद्याप जर्सीसाठी स्पॉन्सर मिळू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयला आशिया कप स्पर्धेसाठी अद्याप स्पॉन्सर मिळू शकला नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ स्पॉन्सविना मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
याआधी बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात करार करण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर झाल्याने ड्रीम 11 सह अनेक ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे आता हा करार संपुष्टात आला आहे. बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात 2023 साली करार करण्यात आला होता. हा करार 2026 पर्यंत राहणार होता. परंतु, या बंदीमुळे करार आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे संघाच्या जर्सीला स्पॉन्सर मिळू शकलेला नाही.
दुलीप ट्रॉफीला २८ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत मध्य विभाग आणि नॉर्थ ईस्ट विभाग यांच्यात क्वार्टर फायनल सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दानिश मालेवारने मध्य विभागाकडून खेळताना नॉर्थ ईस्ट विभागाविरुद्ध २०३ धावा करून धुमाकूळ घातला आहे. या सामन्यात विदर्भाचा फलंदाज दानिश मालेवारने दुलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकवले. तसेच त्याने या सोबत आपल्या नावावर एक मोठा विक्रम रचला आहे. सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या दानिश मालेवारने २०३ धावा केल्यानंतर तो निवृत्त झाला. ८१ वर्षांनंतर द्विशतक झळकावून निवृत्त होणारा दानिश हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.