अमरावतीत काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी मराठा आरक्षणावर ठाम भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन येणाऱ्या काळात दडपले जाईल, असा दावा केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, दुसऱ्या समाजाचे आरक्षण कमी करून नये, अशी मागणीही त्यांनी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून हा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन वानखडेंनी केले. तसेच भाजपने काँग्रेसवर आरोप करण्याऐवजी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतःची ठाम भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.